-
प्रतिनिधी
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने शाळा (School) सर्वेक्षणाचा (ग्रामीण) अहवाल (असर) प्रकाशित केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत ‘असर’ अहवालातील काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. अहवालानुसार, २०.४ टक्के विद्यार्थी संगणकाचा वापर करतात असे नमूद करण्यात आले आहे. तथापि, एकूण १,०८,१४४ शाळांपैकी ७२.९५ टक्के शाळांमध्ये संगणकाचा वापर होतो, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रथम संस्थेच्या अहवालात ४८.३ टक्के शाळांमध्ये संगणक नसल्याचे नमूद आहे, मात्र प्रत्यक्षात ७८.४० टक्के शाळांमध्ये (School) संगणक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच, ९६.८ टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.
फक्त ०.८१ टक्के शाळांचे सर्वेक्षण
प्रथम संस्थेने राज्यातील ८७२ ग्रामीण शाळांचे (School) सर्वेक्षण केले आहे, त्यात ४०९ प्राथमिक आणि ४६३ उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे. मात्र, युडायस (UDISE) डाटा २०२३-२४ नुसार राज्यात १,०८,१४४ शाळा आहेत. त्यामुळे हा अहवाल केवळ ०.८१ टक्के शाळांवर आधारित आहे.
त्याचप्रमाणे, राज्यातील २,०९,६१,८०० विद्यार्थ्यांपैकी केवळ ३३,७४६ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, जे एकूण विद्यार्थ्यांच्या फक्त ०.१६ टक्के इतके आहे.
(हेही वाचा – “दोन मुलं एकत्रित येऊन हिंदीत बोलतात हे दुर्दैव” ; Raj Thackeray यांचं विधान)
अहवालातील सकारात्मक मुद्दे
अहवालात काही सकारात्मक निष्कर्ष नोंदवले गेले आहेत.
- ६ ते १४ वयोगटातील ६०.९ टक्के विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये, तर ३८.५ टक्के विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.
- इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन आणि गणितीय क्रियांमध्ये सुधारणा झाली आहे.
- इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य कोरोना काळातील नुकसान भरून काढत आहे.
- २०२२ च्या तुलनेत २०२४ मध्ये वाचन कौशल्यात सरकारी शाळांमध्ये १०.९ टक्के आणि खाजगी शाळांमध्ये ८.१ टक्के वाढ झाली आहे.
- गणितीय कौशल्यात सरकारी शाळांमध्ये १३.१ टक्के आणि खाजगी शाळांमध्ये ११.५ टक्के वाढ झाली आहे.
महाराष्ट्र देशपातळीपेक्षा १० टक्के पुढे
इयत्ता तिसरीतील विद्यार्थी, जे इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकतात, यांचे प्रमाण देशपातळीपेक्षा १० टक्के जास्त आहे.
- गणितीय क्रियांमध्ये प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे.
- २०२२ च्या तुलनेत २०२४ मध्ये गणितीय कौशल्यांमध्ये १३ टक्के वाढ झाली आहे.
- इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्यात २.२ टक्के वाढ झाली आहे.
(हेही वाचा – Union Budget 2025 : “आयकर कमी करण्यासाठी पंतप्रधानांचा पाठिंबा पण ‘यांना’ समजावणे आव्हानच” ; नेमकं काय म्हणाल्या सीतारमण?)
राज्यातील शालेय प्रवेश आणि डिजिटल सुविधा
- १५ ते १६ वयोगटातील ९८ टक्के विद्यार्थी शाळेत प्रवेशित आहेत.
- शाळाबाह्य मुलांची संख्या सर्वात कमी असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे.
- १४ ते १६ वयोगटातील ९४.२ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहे.
- ८४.१ टक्के विद्यार्थी स्मार्टफोनचा वापर करू शकतात.
- १९.२ टक्के विद्यार्थ्यांकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे.
- ६३.३ टक्के विद्यार्थी शिक्षणासाठी स्मार्टफोन वापरतात, तर ७२.७ टक्के विद्यार्थी सोशल मीडियासाठी वापरतात.
पटनोंदणी दर आणि महामारीतील स्थिती
- २०२४ मध्ये तीन वर्षांच्या पूर्व प्राथमिक शाळांमध्ये नोंदणीचे प्रमाण ९५ टक्के आहे, जे २०२२ मध्ये ९३.९ टक्के होते.
- ६ ते १४ वयोगटातील पटनोंदणी दर ८ वर्षांपासून ९९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
- २०१८ मध्ये ९९.२ टक्के असलेला पटनोंदणी दर २०२२ मध्ये ९९.६ टक्के झाला आणि २०२४ मध्येही स्थिर आहे.
- शाळाबाह्य (School) मुलांचे प्रमाण फक्त ०.४ टक्के असून, देशभरात हे प्रमाण १.९ टक्के आहे.
शालेय शिक्षण विभागाने हा अहवाल राज्यातील प्राथमिक शिक्षणाची सकारात्मक स्थिती दर्शवणारा असल्याचे सांगितले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community