समग्र शिक्षा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे शालेय शिक्षण मंत्री Dada Bhuse यांचे निर्देश 

41
समग्र शिक्षा अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे शालेय शिक्षण मंत्री Dada Bhuse यांचे निर्देश 
  • प्रतिनिधी

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शालेय शिक्षण सुधारणा, डिजीटल शिक्षणाचा प्रसार, शिक्षक कार्यशाळा आणि प्रशिक्षण हे सर्व उपक्रम प्रभावीपणे राबवले जावेत, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री भुसे (Dada Bhuse) यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

बैठकीला राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, राज्य प्रकल्प समन्वयक गोविंद कांबळे, उपसंचालक (वित्त) शार्दुल पाटील, उपसंचालक (प्रशासन) संजय डोर्लीकर, मुख्य अभियंता हेमंतकुमार सावंत आदी अधिकारी उपस्थित होते.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्देश

मंत्री भुसे (Dada Bhuse) यांनी सांगितले की, समग्र शिक्षा अभियानाचा लाभ प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शाळांच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढावी यासाठी समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे संदेश ध्वनी किंवा व्हिडिओ स्वरूपात मुलांना ऐकवण्यावर भर देण्याचे त्यांनी सुचवले.

(हेही वाचा – खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार; Pratap Sarnaik यांचे निर्देश)

शिक्षक आणि संस्थांचा गौरव

मंत्री भुसे (Dada Bhuse) यांनी चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्याचे निर्देश दिले. यामुळे शिक्षक आणि संस्थांना प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले. शिक्षण क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

शाळांसाठी आवश्यक सुविधा

प्रत्येक शाळेत शुद्ध पाणी, शौचालये, लाइटिंग, संगणक, ग्रंथालय, आणि खेळ साहित्य यांसारख्या सुविधा उपलब्ध करण्यावर त्यांनी भर दिला. शाळेच्या इमारतींच्या दुरुस्ती, कंपाउंड वॉल बांधकाम एमआरईजीएस किंवा सामाजिक उत्तरदायित्व निधीतून करण्याबाबतही त्यांनी सुचवले.

(हेही वाचा – Valmik Karad वर अखेर मकोका अंतर्गत कारवाई; सरकारी वकिलाची माहिती)

प्रत्यक्ष संवाद

बैठकीदरम्यान, अकोल्यातील बोर्डी शाळेचे मुख्याध्यापक उमेश चोरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून शिक्षण विभागाने पाठविलेल्या साहित्याचा उपयोग कसा होतो, याबाबत माहिती घेतली. “सर्व शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत, आणि शिक्षण विभाग त्यांच्या अडचणी सोडवण्यास तत्पर आहे,” असे मंत्री भुसे (Dada Bhuse) यांनी या संवादात नमूद केले.

शिक्षण सुधारण्याचा निर्धार

या बैठकीत शिक्षणाच्या गुणवत्तेसह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मंत्री भुसे (Dada Bhuse) यांनी प्रत्येक उपक्रम अंमलात आणण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यक्षमतेने काम करण्याचे आदेश दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.