शाळांना १ मे पासून उन्हाळी सुटी

129

कोरोना काळात शाळा बंद होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, राज्य पूर्ण निर्बंधमुक्त झाले आहे, त्यामुळे राज्य शासनानेही त्यांचा आधीच निर्णय मागे घेतला आहे आणि राज्यातील शाळांना २ मे पासून सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे परिपत्रकच राज्यशासनाने काढले आहे. राज्यशासनाने याआधी शाळा बंद होत्या म्हणून उन्हाळी सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मे महिन्यात शनिवार, रविवार शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शिक्षक वर्गामध्ये तीव्र नाराजी होती. मात्र आता यात राज्य सरकारने सुधारणा करत शाळांना २ मे पासून एक महिन्यासाठी सुटी दिली आहे.

गणेशोत्सव अथवा नाताळ सणांच्या सुट्यांचे समायोजन

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इ. १ ली ते ९ वी व इ. ११ वीच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत संदर्भीय शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून शासन निर्णय/परिपत्रक निर्गमित करण्याबाबत विनंती आहे. सोमवार, २ मे २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून या सुट्टीचा कालावधी रविवार, १२ जून २०२२ पर्यंत ग्राहय धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार, १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार, २७ जून २०२२ रोजी सुरू होतील. शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुटटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या परवानगीने घ्यावी. आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुस-या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील.

(हेही वाचा मराठी नवीन वर्षाला होणार मराठी भाषा भवनाची पायाभरणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.