School : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची शाळा

74
School : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची शाळा
School : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची शाळा
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantraveer Savarkar) हे अनेकांचे स्फूर्तिस्थान आहेत. सावरकरी विचार लसीसारखे काम करतात. त्यामुळेच ही लस बालपणी दिली तर पुढे माणूस बौद्धिकदृष्ट्या सदृढ राहतो. शालेय वयात सावरकर कळू लागले तर पुढे चांगली राजकीय दृष्टी प्राप्त होते. हा दृष्टिकोन समोर ठेवून सावरकर रत्न पुरस्कार प्राप्त गजानन तुकाराम कासावार (Gajanan Tukaram Kasawar) यांनी एक मोठी कामगिरी केली आहे. नगर परिषद वणीद्वारे ९ प्राथमिक शाळा (School) चालवल्या जातात. या शाळांना वेगवेगळ्या थोर पुरुषांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी कासावार यांनी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ५ या शाळेचा स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantraveer Savarkar) नगर परिषद शाळा क्रमांक ५ असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवून त्याचा पाठपुरावा केला. विशेष म्हणजे नगर परिषदेमध्ये कोणी सावरकरांच्या विचारधारेशी संबंधित नव्हते. तरी सुद्धा त्यांनी घेतलेल्या पुढाकाराला आणि पाठपुराव्याला यश मिळाले. सावरकरांच्या नावे शाळा (School) असावी या प्रस्तावाला २००८ मध्ये अधिकृत मान्यता मिळाली.

(हेही वाचा – Tirumala Temple मध्ये आता हिंदूच कर्मचारी असणार; आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे विधान)

२००८ पासून नगर परिषद शाळा क्रमांक ५ चे नाव स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantraveer Savarkar) नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ५ वणी असे झाले आहे. सावरकरांच्या नावाने शाळा (School) असणे हेच अद्भुत आहे. २००८ सालची परिस्थितीतशी प्रतिकूल होती. मात्र मुख्याध्यापक या नात्याने गजानन तुकाराम कासावार (Gajanan Tukaram Kasawar) यांनी मुलांवर सावरकरांचे संस्कार व्हावे म्हणून हे नामकरण घडवून आणले. आता ही शाळा (School) दिमाखात उभी आहे आणि मुलांवर सावरकरांचे संस्कार होत आहेत. २००९ पासून दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसाच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दिनांक २४ व २५ फेब्रुवारीला बाल आनंद मेळावा, क्रीडा स्पर्धा, पालकांचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम असे सुनियोजित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच २६ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमात अनेक प्रख्यात वक्ते सावरकर समजावून सांगतात. याद्वारे लहान मुले व सर्वांनाच सावरकर कळावे आणि त्यानुसार आचरण करावे हा उद्दिष्ट असतो. या वक्त्यांमध्ये विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड, विवेक सरपटवार, माधव सरपटवार, प्रशांत भालेराव अशा विविध मान्यवरांचा समावेश आहे.

तसेच वणी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये सावरकरांच्या पुण्यतिथी आणि जयंतीला सर्व सावरकर भक्त एकत्र येतात आणि तात्यारावांच्या प्रतिमेला हार अर्पण करतात आणि त्यांच्या स्मृती जागवून कार्य करण्याची प्रेरणा घेतात. भविष्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantraveer Savarkar) चौकामध्ये सावरकरांचा अर्धाकृती पुतळा बसवण्याचा सावरकर भक्तांचा मानस आहे. सावरकरी कार्यात विद्यार्थ्यांना सहभागी करण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Swatantraveer Savarkar) जीवनावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात येते. ही स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा दोन गटांमध्ये घेतली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांकडून सावरकरांच्या चरित्राचा अभ्यास करुन घेतला जातो. जेणेकरुन बालवयातच त्यांच्यावर देशभक्ती आणि शौर्याचे संस्कार होतील व पुढे जाऊन ही मुले देशाचे नाव मोठे करतील. यातील उत्कृष्ट स्पर्धकांना रोख बक्षीस स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाते. वणी शहरात सावरकर नावाची ज्योत सावरकर भक्तांच्या प्रयत्नाने तेवत आहे. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर नगर परिषद शाळा क्रमांक ५ चा मोलाचा वाटा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.