शालेय पोषण आहार; भरारी पथक करणार तपासणी

शाळांमध्ये देण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहाराची आता भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथकाची स्थापना केली जाणार आहे. हे भरारी पथक अचानक शाळेला भेट देऊन शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी होते का याची पाहणी करण्यात येणार आहे. शाळांमधून शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप कमी करणे, निकृष्ट प्रतीचा आहार मुलांना देणे, आहाराचे वाटप न करणे, योजनेमध्ये गैरव्यवहार करणे आदी तक्रारी शासनाकडे येत आहेत. त्यामुळे शासनाने भरारी पथके गठित करण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : महापालिका तिरंगा ध्वज खरेदीसाठी मोजणार १८ रुपये २५ पैसे; पण मुंबईकरांना मिळणार मोफत)

भरारी पथके गठित करण्याचा निर्णय

जिल्हास्तरावर भरारी पथक कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदमधील अधिकारी आणि दोन कर्मचारी यांची भरारी पथकामध्ये नियुक्ती केली जाणार आहे. या पथकामार्फत जिल्ह्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेची तपासणी केली जाणार आहे. शाळा तपासणीचा कार्यक्रम गोपनीय ठेवला जाणार आहे. प्रत्येक महिन्याला दहा शाळांची तपासणी भरारी पथकामार्फत केली येईल. मात्र, भरारी पथकास शाळा तपासणी करताना आढळून आलेल्या बाबी भरारी पथकाच्या प्रमुखांनी तीन दिवसांचा अहवाल सादर करून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या निदर्शनास आणून द्यावा लागणार आहे. ज्या शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत, त्या शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात योजना राबविताना गैरव्यवहार होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here