देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण ,आता सध्या मात्र कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. तसेच, रुग्ण दगावण्याचे प्रमाणही कमी असल्याने मुलांच्या शाळांबाबत काय निर्णय घेतला जाणार यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
काय म्हणाले राजेश टोपे
राज्याच्या कॅबिनेटमध्ये शाळा सुरु करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. शाळा सुरु करण्याचा निर्णय कोरोना रुग्ण कमी असणा-या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, अशी चर्चा झाली होती. कोरोना रुग्णसंख्या आणि सद्यस्थिती पाहता शाळांबाबत घेतलेल्या निर्णयचा फेरविचार करता येईल. शाळांबद्दल 8-15 दिवसांत निर्णय घेण्यात येईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीदेखील पालकांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं सांगितलं. मात्र, शाळा सुरु करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ते औरंगाबादेत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते.
येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय
राज्यात कोरोना काळात कायमस्वरूपी शाळा बंदचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहोत. पुढील आठवडाभरात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. येत्या 10-15 दिवसांत पुन्हा शाळा सुरु करण्याची स्थिती असेल, तर आढावा घेऊन निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी असेल, तिथं शाळा सुरु करण्यासंदर्भात येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.
( हेही वाचा: अफगाणिस्तानात भूकंपाचे धक्के! २६ जणं ठार, अनेक जखमी )
पालकांमध्ये दोन मतप्रवाह
कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळं पालकांमध्ये शाळा सुरू करण्याविषयी दोन मतप्रवाह आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीृदेखील पालकांमध्ये शाळा सुरु करण्यासंदर्भात दोन मतप्रवाह आहेत, अशी माहिती दिली. मात्र, आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊन येणाऱ्या कॅबिनेटमध्ये योग्य निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.
Join Our WhatsApp Community