मुंबईतील शाळा, कॉलेज ४ ऑक्टोबरपासून सुरु! महापालिका शिक्षण विभागाने घेतला ‘हा’ निर्णय

कोविड सेंटर, रेल्वे स्टेशनवर कोविड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी तसेच निवडणूक कामांसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

122

राज्यातील शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहे. महापालिका शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक जारी करून मुंबईतील सर्व माध्यमाच्या महापालिका प्राथमिक व माध्यमिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना बुधवारी निर्देश दिले आहेत.

२९ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केले परिपत्रक 

मुंबईसह राज्यातील बंद असलेल्या शाळांच्या इयत्ता पाचवी ते बारावी व शहर भागील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबर २०२१पासून सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार मुंबईतील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग शासनाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका आयुक्तांच्या मंजुरीने महापालिका शिक्षण विभागाने २९ सप्टेंबर २०२१ रोजी परिपत्रक जारी केले आहे.

(हेही वाचा : काँग्रेस पक्ष अध्यक्षविना! कोण निर्णय घेतो माहित नाही! कपिल सिब्बल यांचा घराचा आहेर)

निवडणूक कामांसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले!

या परिपत्रकामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत मुंबईतील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करावेत, असे निर्देश देण्यात आले आहे. या शाळा सुरु करण्यासाठी आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावेत. तसेच शाळा सुरु करण्यापूर्वी व सुरु झाल्यानंतर आरोग्य,स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सुचनांची कार्यवाही करावी. महापालिका शाळांची विभागाच्या सहायक आयुक्तांच्या सहाय्याने सोडियम हायपोक्लोराई सोल्युशनने निजंतुकीकरण करून घ्यावे, तसेच इतर शाळांच्या व्यवस्थापनाने आपल्या स्तरावर सुस्थितीत ठेवावेत. जर शाळांमध्ये कोविड लसीकरण केंद्र व क्वारंटाईन सेंटर असल्यास विभागीय सहायक आयुक्तांच्या मदतीने अन्यत्र स्थलांतरीत करावे. कोविड सेंटर, रेल्वे स्टेशनवर कोविड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी तसेच निवडणूक कामांसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. महापालिका अधिपत्याखाली शाळांनी आपल्या शाळांमधील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळा नजीकच्या महापालिकेच्या किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात, असेही निर्देश दिले आहेत.

शाळेत किती आहे विद्यार्थीसंख्या? 

  • मनपा माध्यमिक शाळा (८ वी ते १०वी) – २४३ व त्यातील विद्यार्थी – ४४,५२८
  • मनपा प्राथमिक शाळा (८ वीचा वर्ग असणाऱ्या) ५३८ व त्यातील ८ वीचे विद्यार्थी २२,८३३ म्हणजे मनपाच्या एकूण शाळा – ७८१ व त्यातील विद्यार्थी – ६७,३६१
  • उर्वरित इतर खाजगी शाळा, शासनाच्या शाळा, इतर बोर्डाच्या शाळा संख्या (८वी ते १२वी) – १,७७२ व त्यातील विद्यार्थी ४,४६,१४१
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.