ठाण्यातील शाळा लवकरच भरणार! दोन दिवसांत होणार निर्णय

येत्या दोन दिवसांत शाळा कधी आणि कशा पद्धतीने सुरु करायच्या याबाबत बैठक बोलावण्यात आली असून, त्यानंतर शाळा सुरु होण्याबाबतचा निर्णय होणार आहे.

134

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड वर्षाहून अधिक कालावधीसाठी बंद असलेल्या राज्यातील शाळा आता लवकरच पुन्हा सुरु होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. याच पार्श्वभूमीवर आता ठाणे जिल्हातील शाळा सुरु करण्यासाठी देखील हालचाली सुरु झाल्या असून, येत्या दोन दिवसामध्ये यावर निर्णय होणार आहे.

येत्या दोन दिवसांत शाळा कधी आणि कशा पद्धतीने सुरु करायच्या याबाबत बैठक बोलावण्यात आली असून, त्यानंतर शाळा सुरु होण्याबाबतचा निर्णय होणार आहे. राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झाले आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार आता विविध जिल्ह्यात आढावा घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय होऊ शकतो.

(हेही वाचा : आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेची नवी तारीख जाहीर! कोणती जाणून घ्या…)

अशी आहे शाळा सुरु करण्याची जुनी नियमावली!

  • शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात/ गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
  • शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
  • विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
  • कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
  • विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.
  • शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.
  • संबंधित शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.