शाळेची घंटा वाजणार नाही… टास्क फोर्सच्या बैठकीत झाला निर्णय

राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येतील, अशी घोषणा राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. पण अजूनतरी शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पहावी लागणार आहे. राज्य सरकारच्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शाळा सुरू करणे घाईचे होईल, असे टास्क फोर्सचे म्हणणे आहे.

राज्य सरकारने लावला ब्रेक

17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. ‘चला मुलांनो शाळेत चला’, या अभियानांतर्गत ग्रामीण भागात 5वी ते 7वी आणि शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली होती. मात्र अवघ्या 24 तासांत या निर्णयाला राज्य सरकारने ब्रेक दिला होता. शाळा-कॉलेज उघडण्याबाबतचा अंतिम निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्याता आला आहे.

(हेही वाचाः आरोग्यमंत्र्यांनी बंद केली शिक्षणमंत्र्यांची ‘शाळा’)

काय होता निर्णय?

शाळांमधील वर्ग भरण्यास आता सुरुवात होणार आहे. मुंबई उपनगर, ठाणे मध्ये शाळा सुरु करण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर काळजीग्रस्त असलेल्या शहरांमधील शाळा सुरु करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

(हेही वाचाः वर्षा गायकवाड शिक्षण खात्यात ‘नापास’?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here