कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा या गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा एकदा शाळा कधी सुरू होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते.
काय आहे निर्णय?
17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर आहे. जिथे कोविड रुग्णांची संख्या कमी आहे, त्याठिकाणी शाळा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शाळा सुरू झाल्या तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
कॉलेज कधी सुरू होणार?
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही राज्यातील कॉलेज सुरू करण्याची शक्यता वर्तवली आहे. 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कॉलेज सुरू करण्यावर विचार केला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले होते. जिथे कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, तिथे कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्याबाबतचा आढावा घेण्यात येईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community