Ligo India : ‘लिगो इंडिया’ प्रकल्पाकडे भारतातील शास्त्रज्ञ आकर्षित, गुरुत्वीय लहरींचे निरीक्षणगृह 2030 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट

गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणारी हिंगोली येथे आता तिसरी प्रयोगशाळा

460
Ligo India : 'लिगो इंडिया' प्रकल्पाकडे भारतातील शास्त्रज्ञ आकर्षित, गुरुत्वीय लहरींचे निरीक्षणगृह 2030 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट
Ligo India : 'लिगो इंडिया' प्रकल्पाकडे भारतातील शास्त्रज्ञ आकर्षित, गुरुत्वीय लहरींचे निरीक्षणगृह 2030 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट

‘चंद्रयान’,’आदित्य’ मोहिमांबरोबरच आता भारतातील शास्त्रज्ञांचे लक्ष ‘लिगो इंडिया’ प्रकल्पाकडे वेधले आहे. पंतप्रधानांनी या प्रकल्पासाठी अलीकडेच 2600 कोटी रुपये मंजूर केले आहे.लिगो इंडिया या प्रकल्पाअंतर्गत गुरुत्वीय लहरींचा अभ्यास केला जाणार आहे. हिंगोली येथे या अभ्यासाला सुरुवात होणार असून या लहरींचे निरीक्षणगृह 2030 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेतील हॅन्डफोर्ड आणि लिव्हींगस्टन या जगातील दोन प्रयोगशाळांबरोबर हिंगोली येथे आता तिसरी प्रयोगशाळा असणार आहे. इटली आणि जपाननंतर गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासक देशामध्ये यापुढे भारताचाही समावेश होणार आहे. त्यामुळे आता हिंगोलीतून थेट जगाकडे पाहण्याचा नवा मार्ग विकसित होणार असल्याने याविषयी हिंगोलीकरांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

(हेही वाचा – Aditya L1 : आदित्यने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत केला नव्या कक्षेत प्रवेश)

विश्वनिर्मितीचे गूढ उकलणारा प्रयोग…

गुरुत्वीय लहरी आणि अंतराळ संशोधनातील विज्ञान आणि अभियांत्रिकीवर प्रकाश टाकणाऱ्या या अभ्यासासाठी काटकोनात छेदणारे इंग्रजी ‘एल’ आकाराची निर्वात पोकळी निर्माण करणारे दोन बाहू तयार केले जाणार आहेत. या दोन्ही मार्गाच्या टोकाला संवेदशील आणि मृदू आरसे बसविले जाणार आहेत. जेथे हे दोन पोकळीचे मार्ग मिळतात तेथून एक प्रकाशझोत एकाच वेळी दोन्ही बाजूला जातील अशा पद्धतीने सोडले जातील. प्रकाश किरण आरशावर परावर्तीत होऊन एकाच वेळी परत येतील असे अपेक्षित असते. पण जेव्हा गुरुत्वीय लहरीचा या प्रकाशकणांशी संबंध येतो तेव्हा निर्वात मार्गिकेचा एक भाग प्रसरण पावतो आणि दुसरा आकुंचन पावतो. प्रकाशकिरणही परावर्तीत होऊन वेगवेगळय़ा वेळी येतात. कृष्ण विवरात गुरुत्वीय लहरी निर्माण होतात. त्यामुळे त्याचे परिणाम शोधण्यासाठी होणारा हा वैज्ञानिक प्रयोग विश्व निर्मितीचे गूढ उकलणारा ठरू शकतो म्हणून वैज्ञानिकांना या प्रयोगाची उत्सुकता आहे.

कामाला वेग अपेक्षित

ज्वालामुखी किंवा भूगर्भातील लहरी नसणारा भाग या प्रकल्पासाठी लागणार होता. म्हणून शास्त्रज्ञांनी निवडलेल्या जागेसाठी हेक्टरी २० लाख रुपये भूसंपादनाचा दर दिल्यामुळे लिगो इंडियाच्या या प्रकल्पाचे कामकाज वेगाने पुढे सरकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.