पर्यटन मंत्रालयातर्फे मुंबईत तृणधान्य खाद्य महोत्सव!

135

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने 13 ते 19 एप्रिल या कालावधीत मुंबईत ताजमहाल पॅलेस येथे एससीओ म्हणजेच शांघाय सहकार्य संघटना तृणधान्य खाद्य महोत्सव आयोजित केला आहे. एससीओ सदस्य देशांमधील (कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि रशिया) शेफ या 9 दिवस चालणाऱ्या खाद्य महोत्सवाला उपस्थित राहतील आणि त्यांच्या विविध पाककृती बनवतील.

( हेही वाचा : भारतविरोधी घटकांवर कडक कारवाई करावी! पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात चर्चा)

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या (आयवायएम 2023) निमित्ताने ताजमहाल पॅलेसने एससीओ तृणधान्य खाद्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या खाद्य महोत्सवामध्ये एससीओ सदस्य देशातल्या शेफ्सनी निवडलेल्या तृणधान्यांपासून तयार केलेले सेंद्रिय खाद्यपदार्थ दाखवले जातील. 14 ते 19 एप्रिलपर्यंत हा महोत्सव लोकांसाठी मुंबईतील ताजमहाल पॅलेसमधील शामियाना रेस्टॉरंट मध्ये दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी खुला असेल.

शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) ही एक आंतरसरकारी संघटना आहे ज्यामध्ये चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान ही आठ सदस्य राष्ट्रे, चार निरीक्षक राष्ट्रे आणि चौदा “संवाद भागीदार” आहेत.

भारत 2023 यावर्षासाठी एससीओचे अध्यक्षपद भूषवत आहे, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने 9 ते 11 फेब्रुवारीपर्यंत एससीओ टुरिझम मार्ट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे, एससीओ तज्ञ स्तरावरील पर्यटन कार्यगटाची बैठक आणि एससीओ पर्यटन मंत्र्यांची बैठक काशी (वाराणसी) येथे 13 ते 18 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत एससीओ सदस्य देशांच्या सरकारांमधील पर्यटन क्षेत्रातील सहकार्याच्या विकासावर झालेल्या कराराच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त कृती आराखड्यावर चर्चा झाली. एससीओच्या सदस्य देशांतील तज्ज्ञांनी या बैठकीत , एससीओ पर्यटन ब्रँडचा प्रचार, एससीओ सदस्य राष्ट्रांच्या सांस्कृतिक वारशाचा पर्यटन क्षेत्रात प्रचार, पर्यटनातील माहिती आणि डिजिटल तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि विनिमय, वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटनामध्ये परस्पर सहकार्याला प्रोत्साहन, सेवांचा दर्जा सुधारणे या मुद्द्यांवर चर्चा केली.

एससीओ देशांमध्ये संस्कृती आणि परंपरांचे वैविध्यपूर्ण मिश्रण आहे, जे त्यांच्या पाककृतींमध्ये योग्यरित्या प्रतिबिंबित होते. एससीओ देशांच्या पाककृती खाद्यप्रेमींना अनोखा आनंद देतील. तृणधान्यांच्या सेवनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि तृणधान्यांचे उत्पादन आणि वापर वाढविण्याच्या उद्देशाने, संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.

कोणत्याही हवमानात उत्पादित तृणधान्यांच्या सेवनाला प्रोत्साहन दिले जात आहे, तृणधान्यांचे सेवन जगाला संयुक्त राष्ट्रांची किमान सहा अनिवार्य शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करू शकते.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, भारत सरकारने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 साजरे करण्याचा प्रस्ताव प्रायोजित केला होता तो संयुक्त राष्ट्र महासभेने स्वीकारला.

आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्यात भारत सरकार आघाडीवर राहण्यासाठी ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 ला ‘लोकचळवळ’बनवण्याचा त्यांचा दृष्टीकोन सामायिक केला आहे आणि भारताला ‘तृणधान्यांचे जागतिक केंद्र’ म्हणून स्थान दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.