महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी शिल्प कलेतून साकारले ‘शिववैभव किल्ले’

173

मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी व्यक्तिमत्वाचा बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक असा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मितीसाठी व संरक्षणासाठी विविध गडदुर्ग बांधले. इतिहासाची साक्ष देणारे सृजनशीलता, शिल्पकलेला वाव देणारे तसेच बालमनावर शौर्याचे व स्वाभिमानाचे संस्कार घडविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून शिववैभव किल्ले (गडदुर्ग) प्रतिकृती निर्मिती शिल्पकला स्पर्धेद्वारे मुलांमध्ये संस्कृतीचे, स्वाभिमानाचे, शौर्याचे संस्कार होण्यास हातभार लागण्यासाठी; तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये या प्रतिकृतींच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कायम स्मरणात राहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून “शिववैभव किल्ले (गडदुर्ग) प्रतिकृती निर्मिती शिल्पकला स्पर्धे”चे मंगळवारी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी जुहू चौपाटी, मुंबई येथे सकाळी ८ ते ११ या वेळेत आयोजन करण्यात आले होते.

( हेही वाचा : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा; ‘डेफिनेटिव्ह अ‍ॅग्रीमेंट’वर स्वाक्षरी)

या स्पर्धेत महानगरपालिकेच्या शाळेतील निवडक १८० विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. यात ६ कलाशिक्षक केंद्राचे ३०-३० विदयार्थ्यांचे गट तयार करण्यात आले. यात विदयार्थ्यांनी प्रतापगड, जंजिरा, शिवनेरी, रायगड, राजगड, सज्जनगड, वसई किल्ला, सिंहगड अशा इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेकविध किल्ल्यांच्या प्रतिकृती समुद्र किनाऱ्यांवरील रेतीत (वाळू)साकारल्या. यावेळी स्पर्धास्थळी शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी (पूर्व उपनगरे) किर्तीवर्धन किरतकुडवे, अधिक्षक (शाळा) निसार खान, प्रशासकीय अधिकारी (शाळा) दिपिका पाटील, विभाग निरिक्षिका अस्मिता कासले, रोहिणी लाळगे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

New Project 9 6

यातील प्रत्येक गटातील अनुक्रमे १ ते ५ क्रमांकांच्या विदयार्थ्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध शिल्पकार दत्ताराम नेरूरकर यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन उप आयुक्त (शिक्षण) केशव उबाळे व शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कला अकादमी प्राचार्य दिनकर पवार यांनी निदेशक मंजिरी राऊत, भूषण उदगीरकर, योगेश मोरे; तसेच सर्व केंद्रप्रमुख व उपकेंद्रप्रमुखांच्या सहकार्याने उत्कृष्टरित्या केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.