वाळूचे अवैध उत्खनन आणि साठेबाजी करणारे एसडीओ, तहसीलदार निलंबित; Chandrashekhar Bawankule यांचा अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा

82
वाळूचे अवैध उत्खनन आणि साठेबाजी करणारे एसडीओ, तहसीलदार निलंबित; Chandrashekhar Bawankule यांचा अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा
  • प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन आणि साठेबाजीला आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या दोन महसूल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तुमसरचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टिकले यांना तात्काळ निलंबित केले आहे. नागपूरच्या विभागीय महसूल आयुक्तांनी केलेल्या चौकशीत हे दोन्ही अधिकारी भ्रष्टाचारात सामील असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

(हेही वाचा – Property Tax : विक्रमी मालमत्ता कर वसूल; करनिर्धारण आणि संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आयुक्त्तांच्या हस्ते गौरव)

भंडारा जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन रोखणे, संबंधित आरोपींवर कारवाई करणे आणि अवैध वाळू वाहतुकीच्या अपघातात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेदरम्यान महसूलमंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सात दिवसांत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तातडीने निलंबनाचे आदेश जारी केले. चौकशीत असे आढळून आले की, तुमसर भागात गौण खनिज प्रकरणात पर्यावरण विभागाची परवानगी नसताना वाळू घाटांतून बेकायदेशीर उत्खनन झाले होते. हा प्रकार गंभीर असल्याचे मानून निलंबनाची कारवाई करण्यात आली.

(हेही वाचा – Bombay High Court च्या नव्या इमारतीसाठी सव्वा दोन एकर जमीन 30 एप्रिलपर्यंत होणार हस्तांतरित)

महसूलमंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याप्रकरणी कठोर भूमिका घेत अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, “अवैध वाळू उत्खनन आणि साठेबाजी हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. सामान्य नागरिकांच्या हक्काच्या वाळूवर बेकायदेशीरपणे डल्ला मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात कुठेही होणार नाही. जिथे असा प्रकार आढळेल, तिथे कठोर कारवाई केली जाईल. राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.” या कारवाईमुळे भंडारा जिल्ह्यातील अवैध वाळू माफियांवर अंकुश बसण्याची शक्यता आहे. तसेच, प्रशासनातील भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार गंभीर असल्याचे संकेत मिळाले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.