कारमधील सर्वच प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक! १ नोव्हेंबरपासून नवे नियम; अन्यथा भरावा लागेल दंड

153

मुंबईत कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहतूक विभागाकडून कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता मुंबईत कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी कारमध्ये वाहन चालकांना आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत यासाठी वाहतूक विभागाने १ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

( हेही वाचा : रविवारी बाहेर पडताय? दोन्ही मार्गावर असणार मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक)

नियमांचे पालन न केल्यास होणार दंडात्मक कारवाई

मुंबईमध्ये याआधी दुचारीवरून प्रवास करणाऱ्या सहप्रवाशाला हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. यानंतर वाहतूक विभागाने कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमांमध्ये आता मोठा बदल केला आहे. या नव्या नियमांनुसार आता चार चाकी वाहनातील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असणार आहे. असे आदेश मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत.

या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांवर मुंबई वाहतूक पोलीस १ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई करतील.

दिल्लीत कारवाई सुरू

दिल्ली वाहतूक पोलिसांनी सीट बेल्टशी संबंधित नव्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारक आणि प्रवाशांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम १९४ ही अंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.