सीटबेल्ट सक्तीला मुदतवाढ देण्याची मागणी; महामार्ग मंत्रालयाच्या आदेशात काय म्हटले आहे?

125

वाहतूक पोलिसांनी चारचाकी गाड्यांमध्ये १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक असल्याचा निर्णय घेतला आहे. चारचाकीमधील सहप्रवाशांना सीटबेल्ट लावण्याचा नियम बंधनकारक आहे. याचे पालन करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे.

( हेही वाचा : अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी; शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा जल्लोष )

बाजारात पुरेसे सीटबेल्ट उपलब्ध होईपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबईतील बऱ्याच टॅक्सी या जुन्या आहेत त्यामुळे या जुन्या वाहनांमध्ये कार उत्पादकांनी सीटबेल्ट दिलेले नाहीत. टॅक्सी संघटनेने चारचाकी उत्पादकांना बाजारात पुरेसे सीटबेल्ट उपलब्ध नसल्याने ते उपलब्ध करण्यास सांगितले आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी या नियमासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे.

दरम्यान पोलिसांकडून ११ नोव्हेंबरपर्यंत फक्त समज दिली जाणार आहे कारवाई करण्यात येणार नाही. त्यानंतर मात्र प्रवाशांनी सीटबेल्ट लावला नसेल तर दंड आकारण्यात येईल असा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

महामार्ग मंत्रालयाच्या आदेशात काय आहे?

  • दुचाकी आणि तीनचाकी वाहनांव्यतिरिक्त सर्व चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट लावणे आवश्यक, मागील आसनावर सर्व व्यक्तींसाठी सुद्धा सीटबेल्ट व्यवस्था आवश्यक
  • प्रवासी आसनावरील आसन आच्छादन हे सीटबेल्ट लावताना अथवा काढताना अडथळा बनू नये.
  • सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहन चालक आणि मालकाविरोधात कारवाई करताना दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. मोटर वाहन कायदा १९८८ कलम १९४(ब) नुसार एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
  • दिल्ली वाहतूक पोलिसांनी सीट बेल्टशी संबंधित नव्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारक आणि प्रवाशांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम १९४ ही अंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.