एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार, लालपरीमधल्या सीट झाल्या गायब

लालपरीला महाराष्ट्राची जीवनवाहिनी असं म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात कुठेही जाण्यासाठी एसटी सेवा बजावत असते. पण तरीही अनेकदा एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर येताना आपल्याला दिसतो. नाशिक सीबीएस ते उगतपुरी या मार्गावर धावणारी एसटीची बस सध्या चर्चेत आली आहे. या बसमधील सीटच गायब झाल्याचे पहायला मिळत असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बसमधील सीट गायब

नाशिक सीबीएस ते इगतपुरी या मार्गावर आधीच एसटी बसेसच्या सेवेचा तुटवडा आहे. असे असतानाच एका एसटी बसमधील मागच्या सीटच गायब असल्याचे समोर येत आहे. एसटी कर्मचारी,महिला आणि पत्रकार यांच्यासाठी राखीव असणा-या सीट या बसमधून काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटी बसेसच्या दुरावस्थेबाबत पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहेत.

(हेही वाचाः पुण्यातील दुचाकीस्वारांना पोलिसांचा इशारा, ‘हे’ करत असाल तर होणार कारवाई)

बस बदलण्याची मागणी

नाशिक ते इगतपुरी या मार्गावर एसटी प्रवास करणा-या विद्यार्थ्यांनी या मार्गावरील बसेस वाढवाव्यात अशी मागणी केली आहे. असे असतानाच आता बसमधील सीट गायब असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे सांगण्यात येत आहे. बस क्रमांक एम एच 07 सी 9140 या एसटी बसची अवस्था खिळखिळी झाली आहे. त्यातच या बसमधील तीन सीट गायब झाल्याने ही बस कालबाह्य झाल्याची शंका प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तसेच ही बस बदलून देण्याची मागणी देखील प्रवासी करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here