- ऋजुता लुकतुके
सेबीनं पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. विजय शेखर शर्मा यांच्यासह पेटीएमचा आयपीओ आला तेव्हा संचालक मंडळात असलेल्या लोकांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार ही नोटीस चुकीची माहिती दिल्याच्या कारणावरुन दिल्याची माहिती आहे. पेटीएमचा आयपीओ नोव्हेंबर २०२१ मध्ये आला होता. या बातमीनंतर पेटीएमचा शेअर सोमवारी ९ टक्क्यांनी घसरला.
पेटीएमला जारी केलेल्या नोटीसमध्ये प्रमोटर क्लासिफिकेशन नियमांचं पालन न केल्या प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सेबीनं चौकशी सुरु केली होती. पेटीएम पेमेंटस बँकेच्या चौकशीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कठोर कारवाई केली होती. (SEBI Notice To Paytm)
(हेही वाचा – Wardha DJ Testing: डिजेची सॉऊंड टेस्टिंग जीवावर बेतली; विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू, वाचा सविस्तर नेमकं काय घडलं?)
रिपोर्टनुसार सेबीनं जारी केलेल्या नोटीसचा प्रमुख मुद्दा विजय शेखर शर्मा यांना प्रमोटर्स म्हणून घोषित करायला हवं होतं हा आहे. जेव्हा पेटीएमचा आयपीओ आला होता त्यावेळी त्यांच्याकडे कर्मचारी या भूमिकेशिवाय व्यवस्थापनाचं नियंत्रण देखील होतं. पेटीएमचा आयपीओ आला तेव्हा कंपनीच्या संचालक मंडळात जे होते त्यांना देखील सेबीनं नोटीस दिली आहे. विजय शेखर शर्मा यांच्या त्या कृतीचं संचालक मंडळानं समर्थन का केलं होतं, असा सवाल सेबीनं केला आहे. सेबीच्या नियमानुसार विजय शेखर शर्मा यांना प्रमोटर्स म्हणून घोषित केलं असतं तर त्यांना एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन्ससाठी पात्र राहता आलं नसतं.
सेबीच्या नियमानुसार एखादी प्रोफेशनली मॅनेज्ड कंपनी घोषित केली जात नाही तोपर्यंत प्रमोटर्सद्वारे संचलित मानलं जातं. व्यावसायिकदृष्ट्या कंपनीचं संचलन करण्यासाठी कंपनीच्या कोणत्याही भागिदाराकडे १० टक्क्यांपेक्षा अधिक भागिदारी असू नये. पेटीएमने मात्र हा नियम मोडल्याचं सेबीच्या लक्षात आलं आहे आणि आता चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पेटीएमनं त्यांचा तिकीट विक्रीचा व्यवसाय झोमॅटोला विकला होता. (SEBI Notice To Paytm)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community