Ghatkopar Hoarding Accident प्रकरणी दुसरी अटक, भिंडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

234
Hoarding Accident : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नोटिसचे पालन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाकडून सूचना

घाटकोपर पूर्व होर्डिंग दुर्घटना प्रकरणात विशेष तपास पथकाकडून गुरुवारी ‘स्ट्रक्चर कन्सल्टंट’ मनोज रामकृष्ण याला अटक करण्यात आली आहे. मनोज रामकृष्ण यांनी दुर्घटनाग्रस्त बेकायदेशीर होर्डिंगला ‘स्ट्रक्चर स्टेबिलिटी’ प्रमाणपत्र दिले होते. दरम्यान भावेश भिंडे याची पोलीस कोठडी गुरुवारी (३० मे) संपली असून न्यायालयाने भिंडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष तपास पथक इगो मीडिया कंपनीची संचालक जान्हवी मराठे यांचा शोध घेत आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

घाटकोपर पूर्व येथे असलेल्या लोहमार्ग पोलिसांच्या जागेवरील महाकाय बेकायदेशीर होर्डिंग १३ मे रोजी पेट्रोल पंपावर कोसळून १७ जणांचा बळी गेला होता आणि जवळपास ८० जण जखमी झाले होते. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात होर्डिं दुर्घटनेप्रकरणी इगो मीडिया या कंपनीचे मालक भावेश भिंडेसह संचालक, तसेच संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करून या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणात भावेश भिंडे याला १६ मे रोजी उदयपूर येथून अटक केली. भावेश भिंडे याची गुरुवारी पोलीस कोठडी संपली. त्याला गुरुवारी किल्ला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – बहुचर्चित जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी कुख्यात डॉन Chhota Rajan दोषी)

दरम्यान विशेष तपास पथकाने गुरूवारी या दुर्घटनेप्रकरणी ‘स्ट्रक्चर कन्सल्टंट’ मनोज रामकृष्ण याला अटक केली आहे. मनोज रामकृष्ण यांनी दुर्घटनाग्रस्त बेकायदेशीर होर्डिंगला ‘स्ट्रक्चर स्टेबिलिटी’ प्रमाणपत्र दिले होते. मनोज रामकृष्ण हे मुंबई महानगरपालिकेच्या पॅनलवर असून त्यांनी या दुर्घटनाग्रस्त होर्डिंगला ८०×८० फुटांचे ‘स्ट्रक्चर स्टेबिलिटी’ प्रमाणपत्र दिले होते. मुळात हे होर्डिंग १२०×१४० होते, व ते बेकायदेशीर होते, तसेच त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते असे विशेष पथकाच्या तपासात समोर आले. मनोज रामकृष्ण याची या दुर्घटनेतील दुसरी अटक आहे, शुक्रवारी त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. इगो मीडिया प्रा. लिमिटेड या कंपनीची संचालक असलेल्या जान्हवी मराठे या फरार असून विशेष तपास पथकाकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. होर्डिंग दुर्घटना प्रकरणात विशेष पथकाकडून लोहमार्ग पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शहाजी निकम तसेच इगो मीडिया कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.