Ac Train : एसी लोकलला मारक ठरतोय टीसी!

243
Ac Train : एसी लोकलला मारक ठरतोय टीसी!
Ac Train : एसी लोकलला मारक ठरतोय टीसी!
सचिन धानजी

‘ए चल एसी लोकलमध्ये चढ’… त्यावर दुसरा मित्र म्हणतो, ‘अरे नाही रे, माझा सेकंडचा पास आहे, टीसीने पकडले तर फुकटचा खिसा कापला जाईल’, त्यावर पहिला मित्र म्हणतो, ‘अरे टीसी बीसी कोणी नसतो, या गर्दीत टीसी येत नाही, ते फक्त दुपारच्या वेळात चढतात आणि तसंही आपल्या गाडीत पुढे जावून गर्दीच होणार आहे, कसला येतोय टीसी. आम्ही केव्हापासून एसी लोकलमधून प्रवास करतोय, कधीच टीसीला बघितलं नाही की टीसीने आपल्याला पकडलंही नाही, चल पटकन गाडीत चढ,असं म्हणत ते सर्व लोकलमध्ये चढतात. खरं तर हा संवाद एसी लोकलने प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांच्या कानावर पडत असतो आणि प्रामाणिकपणे एसी लोकलचा पास काढून जाणाऱ्या प्रवाशांचा तिळपापड होतो. आम्ही जास्त पैसे मोजून एसीचा पास काढायचा आणि सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लासवाले बिनधास्तपणे गाडीत चढवून जागा अडवून बसतात आणि पैसे देऊनही उभ्याने प्रवास करतो हे कोणत्याही पासधारक प्रवाशाला सहन होणारे नसते. (Ac Train )

मुंबईमध्ये डिसेंबर २०१७मध्ये पहिली एसी लोकल सुरु झाल्यानंतर आजपर्यंत मध्य रेल्वेवर एकूण ५६ गाड्यांच्या फेऱ्या होत होत्या, त्यात आता १ नोव्हेंबरपासून १० फेऱ्या अधिक वाढवल्या, त्यामुळे ही संख्या ६६ एवढी झाली आहेत. तर पश्चिम रेल्वेवर ७९ एसी लोकल चालवल्या जात आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वेवर सुरु असलेल्या एसी लोकलमधील प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असून ही संख्या दरदिवशी लाखाच्या आसपास प्रवाशी प्रवास करत आहेत आणि पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमधील प्रवाशांची संख्याही आता वाढत जात असून ६६ हजारांहून ७९ हजार तर कधी ९० हजारपर्यंत हा आकडा पोहोचतो. हे आकडे तिकीट आणि पास विक्रीवरून काढली जात आहे. मुळात आधीच गाड्यांची संख्या कमी आणि त्यातच जर या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांची योग्यप्रकारे तपासणी होत नसेल तर पासधारक गर्दीत उभा राहून धक्के खावून जातो आणि फुकटे प्रवाशी मस्तपणे बसून प्रवास करतात असेच चित्र दिसायला लागले आहे.

(हेही वाचा : Uttarakhand : ३० मदरशांमध्ये ७४९ गैर मुस्लिम विद्यार्थी शिकताहेत Islam)

रेल्वे प्रशासन म्हणते आमच्याकडे तिकीट तपासनीसची अनेक पदे रिक्त आहेत. पण ही पदे भरली जावू नये म्हणून आपल्याला कोणी रोखले? मुळात रेल्वेमध्ये स्पोर्ट्स विभागातील खेळाडूंची टीसीमधून नेमणूक केली जाते हेच चुकीचे आहे. यांचा अर्धा वेळ खेळात आणि स्पर्धेत जात असतो. त्यामुळे हे खेळाडू स्पर्धेत खेळण्यासाठी गेल्यानंतर टीसींची संख्या काही दिवसांकरता कमी होते. त्यामुळे टीसीकरता स्वतंत्र नियुक्ती केली जावी. पण सरकारी कामाची प्रवृत्ती यांच्या अंगात भिनल्यामुळे यांच्याकडून ही अपेक्षा करणेच चुकीचे ठरेल. त्यामुळे या पदांवरील टीसींना स्वेच्छा निवृत्ती घ्यायला लावून त्यांना पगाराऐवजी कमिशन बेसवर टार्गेट दिले जावे. जेवढे जास्त फुकटे प्रवाशी पकडून दंड वसूल कराल तेवढे जास्त कमिशन मिळेल या अटींवरच त्यांना पुन्हा रेल्वेत सामावून घ्यावेत, तसेच टीसींची अनेक पदे रिक्त असल्याने निवृत्त टीसींना ११ महिन्यांच्या कालावधीकरता कमिशन बेसवर नियुक्ती करून रेल्वे लोकलमधील तपासणीची मोहिम तीव्र केल्यास प्रवाशांनाही चाप बसेल आणि रेल्वेचाही महसूल वाढेल. ज्यावेळी एसी लोकल रिकाम्या जात होत्या तेव्हा तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली होती, पण आता या लोकलला गर्दी होत असल्याने रेल्वे प्रवाशाने ही सवलत मागे घ्यायला हवी, कारण ज्यांना एसीमधून प्रवास करायचे आहे ते जास्त पैसे मोजून तिकीट काढणारच. त्यामुळे ही सवलत पुढे चालू ठेवणे हेही योग्य नसून रेल्वे प्रशासनाचे या सर्व बाबींकडे लक्ष नसल्याने जास्त पैसे मोजून जो प्रवासी एसीकडे वळला होता तो आता परत फर्स्ट क्लासकडे वळत आहे. आज अशी परिस्थिती आहे की फर्स्ट क्लासचा डबा भरलेला असतो आणि सेकंड क्लासचा रिकामा असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा फर्स्ट क्लासमधून प्रवास करणारेही प्रारंभीच्या स्थानकात सेकंडमधून प्रवास करतात, त्यामुळे भविष्यात हे फर्स्ट क्लासवाले प्रवासीही सेकंड क्लासकडे वळले तर नवल वाटू नये.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.