पुण्यात सलग दुस-या दिवशी बीए व्हेरिएंटचे रुग्ण सापडले, तर मुंबईत रुग्णसंख्येत वाढ

पुण्यात सलग दुस-या दिवशी बीए व्हेरिएंटचे नवे १८ रुग्ण सापडले आहेत. मात्र रविवार, ७ आॅगस्टच्या १८ नव्या बीए व्हेरिएंटच्या रुग्णामुळे राज्यातील आतापर्यंत आढळलेल्या ४ आणि ५ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या २७५ तर बीए व्हेरिएंट २७५ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या आता २५० वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत दर दिवसाला चारशेच्या घरात नव्या रुग्णांची नोंद होत असल्याने मुंबई आणि हळूहळू ठाण्यातही रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

रविवारी केवळ एकाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद

रविवारच्या नोंदीत पुण्यात बीए ४ व्हेरिएंटचा एक तर बीए ५ व्हेरिएंटचे २ तर बीए २.७५ व्हेरिएंटचे १६ रुग्ण आढळले. पुण्यातील इस्कॉन प्रयोगशाळेत या रुग्णांची तपासणी झाली आहे. रविवारच्या नोंदीत १ हजार ८१२ नवे रुग्ण आढळले तर गेल्या २४ तासांत १ हजार ६७५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. घटत्या रुग्णसंख्येत पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाल्याचे रविवारी आरोग्य विभागाच्या नोंदीत दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून दर दिवसाला कोरोनाच्या किमान ७ मृत्यूची नोंद होत होती. त्यातुलनेच रविवारी केवळ एकाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

मुंबईतील वाढत्या सक्रीय रुग्णांची संख्या 

  • ५ ऑगस्ट – २ हजार २३५
  • ६ ऑगस्ट – २ हजार ५९१
  •  ७ ऑगस्ट – २ हजार ७३४

ठाण्यातील वाढत्या सक्रीय रुग्णांची संख्या 

  • ५ ऑगस्ट – ८७३
  • ६ ऑगस्ट – ९३७
  • ७ ऑगस्ट – १ हजार ७६

पुण्यातील घटत्या सक्रीय रुग्णांची संख्या 

  • ५ ऑगस्ट – ३ हजार १३८
  • ६ ऑगस्ट –  ३हजार ३६
  • ७ ऑगस्ट – २ हजार ९२४

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here