ओडिशाच्या किनारपट्टीवरून VLSRSAM ची सलग दुसरी उड्डाण चाचणी यशस्वी

77
ओडिशाच्या किनारपट्टीवरून VLSRSAM ची सलग दुसरी उड्डाण चाचणी यशस्वी

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने, व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल (VLSRSAM) च्या एकापाठोपाठ एक यशस्वी उड्डाण चाचण्या केल्या आहेत. सलग दुसरी चाचणी 13 सप्टेंबर रोजी ओडिशातील चंडीपूर स्थित एकात्मिक चाचणी तळ येथून घेण्यात आली.

(हेही वाचा – Assam मध्ये बेकायदा बांधकाम तोडणाऱ्या पथकावर मुसलमानांचा हल्ला; अनेक पोलीस जखमी)

या क्षेपणास्त्राने अत्यंत कमी उंचीवरून उडणाऱ्या आणि रडारवर दिसू न येणाऱ्या अतिवेगवान हवाई लक्ष्यावर हल्ला केला आणि लक्ष्य निष्प्रभ करण्याची अचूकता आणि क्षमतेचे दर्शन घडवले. गुरुवारी 12 सप्टेंबर 2024 रोजी पहिली चाचणी घेण्यात आली तेव्हाही VLSRSAM क्षेपणास्त्राने कमी उंचीवरील लक्ष्याचा भेद यशस्वीपणे पूर्ण केला. सलग घेण्यात आलेल्या या चाचण्या केवळ शस्त्र प्रणालीची विश्वासार्हता दर्शवत नाहीत तर प्रणालीतील विविध घटकांमध्ये अलीकडील काळात करण्यात आलेल्या सुधारणा देखील प्रमाणित करतात. (VLSRSAM)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : विधानसभा निवडणूक दिवाळीपूर्वीच?)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, भारतीय नौदल आणि सर्व संबंधित चमूंचे कौतुक केले . ते म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे सशस्त्र दलांना तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणखी चालना मिळेल. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी देखील VLSRSAM प्रणालीच्या उड्डाण चाचण्यांमध्ये सहभागी चमूचे अभिनंदन केले. (VLSRSAM)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.