दिल्लीत (Delhi earthquake) आज दुपारी चारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीसह गाझियाबाद, नोएडा आणि हरियाणा येथेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Earthquake tremors felt in Delhi. Details awaited. pic.twitter.com/nRMLKZ9DdK
— ANI (@ANI) October 15, 2023
दुपारी दिल्ली-एनसीआर भागात रविवारी (दि. १५) दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणाच्या फरिदाबादपासून १३ किमी अंतरावर होता. भूकंपाची तीव्रता इतकी होती की, लोक घराबाहेर पडले आणि रस्त्यावर आले, मात्र या भूकंपात कोणतीही हानी झाली नाही, पण रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोकं घरातच होती. जमीन हादरताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. यापूर्वी ३ ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते.
Join Our WhatsApp Community