दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान आता दहशतवाद्यांच्या तावडीत सापडला आहे. नुकतच 13 ऑगस्ट रोजी बलुचिस्तानमध्ये चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 4 चिनी नागरिक आणि 9 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते आणि आता रविवार, 20 ऑगस्ट रोजी खैबर पख्तूनख्वामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 11 मजूर ठार झाले.
अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अशांत उत्तर वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यात रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 11 मजूर ठार झाले आणि दोन जण जखमी झाले, असे पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजने म्हटले आहे.
(हेही वाचा RBI च्या नव्या नियमामुळे गृह कर्जाचे EMI वाढणार!)
Join Our WhatsApp Community