मुंबईकरांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. २० डिसेंबर ते १८ जानेवारी पर्यंत मुंबईत जमावबंदी लागू करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पाच किंवा आधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. (Mumbai Police)
या जमावबंदीच्या कालावधीत शहरात लाऊडस्पीकर, बॅंड आणि फटाके फोडण्यावर बंदी असेल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. (Mumbai Police)
(हेही वाचा :Maratha Reservation : गिरीश महाजन आणि इतर मंत्री जरांगे यांची भेट घेणार)
या काळात कशावर आहे बंदी
- मुंबईत १८ जानेवारीपर्यंत लाऊडस्पीकर, बॅंड आणि फटाके फोडण्यावर बंदी असेल.
- कलम १४४ लागू करण्यात आल्याने ५ किंवा त्याहून आधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.
- सभा तसेच आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
- कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
- न्यायालये, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांभोवती लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई असेल.
- सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यास बंदी असेल.
- मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
- या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे मुंबई पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हेही पहा –