ज्ञानवापी आणि महादेव मंदिर वाद, भोंगा प्रश्न या संदर्भात आंदोलन किंवा मोर्चा निघू शकतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी नाशिकमध्ये शुक्रवारपासून 12 जूनपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत कुठल्याही प्रकारचे आंदोलन, मोर्चा, सभा, निदर्शने करता येणार नाहीत.
जमावबंदी दरम्यान यावर असणार बंदी
जमावबंदीच्या कालावधीत कोणतेही दहाक पदार्थ, स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाहीत. तसेच, शस्त्रे वापरणा-यांवर कारवाई केली जाणार आहे. प्रतिमांचे वा प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी महाआरती, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, पेढे वाटप करणे, फटाके वाजवणे, घंटनाद करणे यावरदेखील बंदी राहणार आहे.
( हेही वाचा: सैन्य भरतीचे नियम बदलणार; आता 4 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती )
29 मे ते 12 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू
मागच्या अनेक दिवसांपासून राज्यात मंदिर, मशीद, भोंगे, हनुमान चालिसा हे मुद्दे गाजत असून, त्यावरुन वातावरण तापले आहे. यामुळे आंदोलन वा मोर्चा निघू शकतो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये, यासाठी 29 मे ते 12 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, लग्न, धार्मिक विधी, प्रेतयात्रा आणि सिनेमा गृह यांना हे नियम लागू नसणार आहेत.