आता विमातळावर बॅगांची तपासणी होणार झटपट

सर्वात व्यस्त विमानतळ अशी ओळख असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा तपासणी आता दुप्पट वेगवान होणार आहे. त्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. एकात्मिक सुरक्षा तपासणी प्रवेश यंत्रणा कार्यान्वित करणारे मुंबई हे देशातील पहिले विमानतळ ठरले आहे.

विमानतळावर अनेकदा बॅगांची तपासणी झटपट होत नसल्यामुळे, प्रवाशांना कित्येक तास ताटकळत राहावे लागते. परंतु, आता बॅगांची नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगाने तपासणी होणार असल्याने, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

( हेही वाचा :Ashadhi Wari 2022: आषाढी वारीत रंगला विलोभनीय रिंगण सोहळा )

दर तासाला 280 प्रवाशांची होणार तपासणी

मुंबई विमानतळावर एकूण 13 एटीआरएस आणि सेन्सरवर आधारित यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्याद्वारे प्रतितास सरासरी 280 प्रवाशांची सुरक्षा तपासणी करता येईल. पारंपारिक पद्धतीने तासाभरात जास्तीत जास्त 130 प्रवाशांची सुरक्षा तपासणी करता येत होती. त्यात आता दुपटीने वाढ होणार आहे. टर्मिनलमधून प्रस्थान करणा-या प्रवाशांच्या सोयीसाठी टर्मिनल 1 येथेही एटीआरएस बसवण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here