Security Deposit For Tented House : घर मालकांनी घराची अनामत रक्कम परत दिली नाही म्हणून बघा या माणसाने काय केलं?

कॉमेडियन कश्यप स्वरुपने सोशल मीडियावर आपल्या घर मालकाविरोधात आग पेटवली आहे. 

326
Security Deposit For Tented House : घर मालकांनी घराची अनामत रक्कम परत दिली नाही म्हणून बघा या माणसाने काय केलं?
  • ऋजुता लुकतुके

मुंबईतील एक कॉमेडियन कश्यप स्वरुपने (Kashyap Swaroop) सोमवारी आपल्या ट्विटर खात्यावर एकामागून एक ट्‌विट्स टाकायला सुरूवात केली. ही सगळी ट्विट्स त्याच्या घर मालकाविरोधात होती. कथित रित्या, त्याच्या घर मालकाने भाडे करार करताना दिलेली अनामत रक्कम त्याला परत दिलेली नाही. आणि म्हणून कश्यप आपल्या घर मालकाविरुद्ध सोशल मीडियावर एक प्रकारे मोहीमच राबवत आहे. सोमवारी याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू होती. (Security Deposit For Tented House)

या ट्विट्समध्ये कश्यपने (Kashyap Swaroop) घर मालकाबरोबर व्हॉट्सॲप चॅटवर झालेल्या बोलण्याचे स्क्रीन शॉटही टाकले आहेत. इतकंच नाही तर कुणी वकील त्याला या बाबतीत मदत करु शकेल का, असा सवालही कश्यपने (Kashyap Swaroop) विचारला आहे. (Security Deposit For Tented House)

(हेही वाचा – Bribe : पंचवीस लाख रुपयांचे दोन हप्ते आणि ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या रुपात मागितली जीएसटी अधिकाऱ्यांनी लाच)

‘माझ्या घर मालकाने भाडेकराराची मुदत संपण्याच्या आतच मला घर सोडायला सांगितलं आहे. आणि मी घर चांगल्या स्थितीत सोडलेलं असतानाही माझ्या अनामत रकमेतील ६० टक्के रक्कम त्याने मला दिलेलीच नाही. या बाबतीत कुणी वकील मला मदत करू शकेल का?’ अशी कश्यपची (Kashyap Swaroop) पोस्ट आहे. (Security Deposit For Tented House)

कश्यपच्या (Kashyap Swaroop) या पोस्टला अर्थातच चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी घर मालकाविरोधात नाराजी व्यक्त केली. तर काहींनी पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे कश्यप (Kashyap Swaroop) पोलिसांकडे गेला असावा. कारण, थोड्या वेळातच त्याने एक पोस्ट टाकली की, ‘मला दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. मी मुंबई पोलिसांकडे गेलो. आणि त्यांनी मदतही केली. संबंधित माणसाला त्यांनी त्याची बाजू ऐकून घेण्यासाठी पोलीस स्थानकात बोलवलं. यावर त्या व्यक्तीने आपण पैसे हस्तांतरित केले असल्याचं सांगितलं. पण, तेव्हा पैसे माझ्या खात्यात आले नव्हते. पण, एक तासांत ते आले. मुंबईत चांगली माणसंही आहेत. त्यांच्याच मदतीमुळे मी या समस्येतून बाहेर आलो.’ कश्यपची (Kashyap Swaroop) ही व्हायरल झालेली पोस्ट ८ लाखांच्या वर लोकांनी पाहिली आहे. तर हजारोंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. (Security Deposit For Tented House)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.