Jammu & Kashmir News: अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर संवेनदशील भागात वाढवली सुरक्षा व्यवस्था!

131
Jammu & Kashmir News: अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर संवेनदशील भागात वाढवली सुरक्षा व्यवस्था!

अमरनाथ यात्रेसाठी (Amarnath Yatra) जम्मू-काश्मीरमध्ये निमलष्करी दलाची तैनाती सुरू करण्यात आली आहे. जम्मू जिल्ह्याला यावेळी निमलष्करी दलाच्या 24 अतिरिक्त तुकड्या मिळाल्या आहेत. ज्या गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सहा अधिक आहेत. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर ज्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे तिथे आणि यात्रेकरूंची थांबण्याची ठिकाणे, लंगर आणि इतर ठिकाणी निमलष्करी दल देखील तैनात केले जात आहेत. (Jammu & Kashmir News)

निमलष्करी दलाच्या (Paramilitary Forces) 10 कंपन्या जम्मूमध्ये पोहोचल्या आहेत, ज्या पुरानी मंडी, राम मंदिर, पीरखो मंदिर, भगवती नगर बेस कॅम्पमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय पुरमंडल मोर ते झज्जर कोटली या संपूर्ण महामार्गावर सैनिक पाठवण्यात आले आहेत. यामध्ये कुंजवानी, गांगयाल, सिद्धदा, नगरोटा या भागांचा समावेश आहे. इतर कंपन्याही येत्या तीन-चार दिवसांत पोहोचतील. (Jammu & Kashmir News)

(हेही वाचा – Kane Williamson : केन विल्यमसनने कर्णधारपदाच्या राजीनाम्याबरोबरच किवी बोर्डाबरोबरचा करारही का सोडला?)

या अतिरिक्त कंपन्यांशिवाय जम्मू-काश्मीर पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात येणार आहेत. या ठिकाणांव्यतिरिक्त पोलिसांनी आरएस पुरा, सुचेतगढ, अखनूर, परगवाल, ज्योदियान, खौद, अरनिया, अब्दुलियान, मीरान साहिब भागात काही ठिकाणे ओळखली आहेत ज्यांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जाऊ शकते. या ठिकाणी निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. यामध्ये ITBP, SSB, CISF या कंपन्यांचा समावेश आहे. (Jammu & Kashmir News)

(हेही वाचा – TamilNadu : विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू!)

एकूणच, संपूर्ण जम्मू जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी निमलष्करी दल आणि पोलिसांसह सुमारे 15 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20 टक्के अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एसएसपी जम्मू विनोद कुमार यांनी सांगितले की, यात्रेच्या सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. काही संवेदनशील क्षेत्रे निश्चित करण्यात आली असून, तेथे विशेष सुरक्षा असेल.  (Jammu & Kashmir News)

हेही पाहा – 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.