सूर्यमालेतील ग्रहांसंदर्भात दि. २१ जानेवारी रोजी आकाशात एक विलक्षण चित्र आपल्याला अनुभवता येणार आहे. सूर्यमालेतील सहा ग्रह (Planets) एका सरळ रेषेत येणार आहेत. सूर्यमालेतील मंगळ, गुरू, युरेनस (Uranus), नेपच्यून(Neptune), शुक्र आणि शनी हे ६ ग्रह दि. २१ जानेवारी रोजी एका सरळ रेषेत पाहायला मिळणार आहेत. हे दृश्य सूर्यास्तानंतर पाहता येणार असल्याचे संशोधकांना सांगितले आहे. (Planets)
( हेही वाचा : अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा; C. P. Radhakrishnan यांचे आवाहन)
दरम्यान मंगळ, गुरू, शुक्र आणि शनि हे ४ ग्रह डोळ्यांना सहज दिसतील परंतु नेपच्यून आणि युरेनस पाहण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागणार आहे अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. ग्रहांच्या या एका रेषेत येण्याच्या स्थितीला ‘प्लॅनेटरी परेड’ म्हणजेच ‘ग्रहसंरेखन’ म्हणतात. या वर्षातील पहिले ग्रह संरेखन २१ जानेवारी रोजी आकाशात पाहायला मिळणार आहे. (Planets)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community