मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे यंदा 76वे वर्ष. यानिमित्त मराठवाड्यातील सिद्धार्थ उद्यानात हुतात्मा स्मारकाजवळ ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यंदाचं वर्ष हे मुक्तिसंग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण करण्यात आले तसेच या अमृत महोत्सवी वर्षाची सांगताही आज मुख्यमंत्र्याच्या उपस्थित होणार आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरांत करण्यात आले आहे. शिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीचेही आयोजन येथे करण्यात आलं होतं.
17 सप्टेंबर 1948 रोजी 8 जिल्ह्यांचा मराठवाडा हैद्राबाद मुक्ती संस्थानातून मुक्त झाला. हैदराबादमध्ये होणाऱ्या प्रचंड अत्याचारांतून मराठवाड्याची सुटका झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्ष, एक महिना आणि दोन दिवसांनंतर मराठवाड्यातील नागरिक मुक्त झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक क्रांतीकारकांनी आपलं बलिदान दिले. त्या हुतात्मा स्मारकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.
(हेही वाचा – Kokan Ganeshotsav 2023 : रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं; नियोजनाच्या अभावामुळे गाड्या ६ तास उशीरानं)
गेल्या 3 दिवसांपासून मुक्ति संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुक्तिसंग्रामाच्या 75 वर्षाच्या पूर्तीनंतर आता पुढे काय करायचं आहे, याचाही विचार यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community