IAS Pooja Khedkar यांची निवड होणार रद्द? काय म्हणतात अविनाश धर्माधिकारी?

केंद्र सरकार आणि लाल बहादूर शास्त्री अकादमी यांनी हा तपास एका प्रकरणासाठी न ठेवता इतरांनी सुद्धा कोणी नियमांचा गैरफायदा घेतला नाही ना, हे देखील तपासून घेतले पाहिजे, असे अविनाश धर्माधिकारी म्हणाले.

255

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar)  यांनी आयएएस होण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. त्यामुळे त्या वादात सापडल्या आहेत. त्यांचे प्रशिक्षण थांबवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर मसुरीतील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये परत बोलावण्यात आले आहे. त्यानुसार पूजा खेडकर यांचे भवितव्य काय असणार यावर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी स्पष्टच सांगितले.

सध्या पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे खेडकर कुटुंबीय पुण्याच्या बाणेरमधील बंगल्याला कुलूप लावून पळून गेले आहेत. तर, दुसरीकडे पूजा खेडकर यांची परतवारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. पूजा खेडकर यांच्या अपंग आणि दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण गंभीर आहे आणि या गांभीर्याने सरकार पुढचे पाऊल उचलत आहे. विशेष म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) अजून कायम झालेल्या नाहीत, त्यांचे अद्याप प्रशिक्षण सुरू आहे. त्यामुळे, राज्य सरकारने जे पाऊल उचलले आहे, ते योग्य आहे, असे अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा Congress मध्ये धुसफूस; विधान परिषद निवडणुकीनंतर नाराज आमदारांविषयी चर्चेला उधाण )

याआधी दोघांची निवड झालेली रद्द

केंद्र सरकार आणि लाल बहादूर शास्त्री अकादमी यांनी हा तपास एका प्रकरणासाठी न ठेवता इतरांनी सुद्धा कोणी नियमांचा गैरफायदा घेतला नाही ना, हे देखील तपासून घेतले पाहिजे. तसेच, याप्रकरणी कठोरपणे तपास झाला नाही तर व्यवस्थेला तडा जाईल. बोगस प्रमाणपत्रासंदर्भातील आरोप सिद्ध झाल्यास पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्यावर गंभीर कारवाई होऊ शकते, भारतीय प्रशासकीय सेवेत निवड रद्द झालेली याआधीची 2 प्रकरणे होऊन गेलेली आहेत, अशी माहितीही अविनाश धर्माधिकारी यांनी दिली.

पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांना आता मुसरीत परत बोलवण्यात आले आहे. त्यामुळे, लाल बहादूर शास्त्री अकादमीमध्ये दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर यांना विविध प्रश्न विचारले जातील, तसेच कागदपत्रे सादर करावे लागतील, असे धर्माधिकारी यांनी सांगितले. तसेच, जो कोणी खोटं प्रमाणपत्र देत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, अशी माहितीही अविनाश धर्माधिकारी यांनी दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.