मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूका (Mumbai University Senate Election) रविवारी (२२ सप्टेंबर) घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका या पुढे ढकलल्या होत्या. मात्र मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या स्थगितीच्या विरोधात युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावरुन सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत रविवारीच ही निवडणूक घ्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. (Senate Election 2024)
(हेही वाचा – ठरलं ! पुणे विमानतळाला जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे नाव; Devendra Fadsanis यांची पुण्यात घोषणा)
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला दुसऱ्यांदा स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. आणि निवडणुकीच्या स्थगितीच्या निर्णयाला आव्हान देण्यात दिलं होते. त्यानंतर ए एस चांदोरकर (AS Chandorkar) यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी शनिवारी पार पडली.या सुनावणीत हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला फटकारलं आहे. तसेच सिनेटच्या निवडणूका रविवारीच घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता रविवारी 22 सप्टेंबरलाच मुंबई विद्यापीठाची निवडणूक होणार आहे. (Senate Election 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community