काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाकडून अचानक सिनेट निवडणुकीला (Senate Election) स्थगिती देण्यात आली होती. पुढील आदेश मिळेपर्यंत ही स्थगिती कायम ठेवण्यात आली. त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं होतं. पूर्वनियोजित वेळेनुसार १० सप्टेंबर २०२३ रोजी ही निवडणूक होणार होती.
अचानक निवडणुका (Senate Election) रद्द केल्याने मनसे आणि ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. या निडणुकीसाठी ठाकरे आणि मनसे गट उत्सुक होते, त्यांनी तशी तयारी देखील केली होती.
(हेही वाचा – MLA Disqualification Case: सुधारित वेळापत्रक सादर करण्यास विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी?)
अशातच आता मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचे (Senate Election) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका आता थेट पुढल्या वर्षी म्हणजेच एप्रिल महिन्याच्या २१ तारखेला होणार आहेत. तर २४ एप्रिल २०२४ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठीच्या नोंदणीसाठी नव्याने मतदार नोंदणी आजपासून (३० ऑक्टोबर) सुरू होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात सिनेट निवडणुका (Senate Election) स्थगित केल्याच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर मुंबई विद्यापीठाने सुधारित संभाव्य निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान सिनेट निवडणुकांसाठी नव्याने मतदार नोंदणी करावी लागणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community