शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कसा असावा? सरकारला पाठवा तुमचे अभिप्राय, शिक्षण मंत्रालयाने मागवल्या सूचना

139

शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासह भारतातील संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चे उद्दिष्ट आहे. शालेय शिक्षण हे मुलांच्या जीवनाचा पाया घालण्याचे काम करते. शालेय शिक्षणाच्या संदर्भात, NEP 2020 ने 10+2 संरचनेच्या ऐवजी 5+3+3+4 संरचना सुरू करण्याची शिफारस केली आहे. यात पायाभूत, पूर्वतयारी, मध्यम आणि माध्यमिक या विविध टप्प्यांवर अभ्यासक्रम आणि शैक्षणिक बदल सुचवणाऱ्या विकासात्मक दृष्टीकोनांवर भर दिला आहे. नव्या शैक्षणिक धोरणात (NEP 2020) संस्कृतीची उत्तम पायाभरणी, समानता आणि सर्वसमावेशकता, बहुभाषिकता, अनुभवात्मक शिक्षण, शैक्षणिक सामग्रीचा भार कमी करणे, अभ्यासक्रमात कला आणि क्रीडा यांचे एकत्रीकरण अशा सक्षमतेवर आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे.

नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात केलेल्या मोबाइल ॲप सर्वेक्षणात सुमारे 1,50,000 भागधारकांकडून अभिप्राय प्राप्त झाले आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या नागरिक केंद्रित सर्वेक्षणाला 12,00,000 हून अधिक भागधारक अभिव्यक्त झाले आहेत. शालेय शिक्षण, शिक्षक आणि प्रौढ शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये सहभागी लोकांनी मते व्यक्त केली आहेत. विविध स्तरांवरील लोकांनी व्यक्त केलेल्या मतांमधून सर्व क्षेत्रांमधून NEP 2020 च्या शिफारशींचे समर्थन दिसून आले.

या मतांची दखल घेऊन, 20 ऑक्टोबर 2022 रोजी शिक्षण मंत्रालयाने पायाभूत टप्प्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे नियोजन केले आणि त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात पण केली. या पायाभूत स्तरावरील राष्ट्रीय अभ्यासक्रम संरचना म्हणजेच NCF-FS च्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षणासाठीचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा – पूर्व मसुदा देखील तयार आहे. शालेय शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा, अनेक अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोन, अध्ययन-शैक्षणिक साहित्य या सर्व बाबी लक्षात घेता विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षक अध्यापक, तज्ञ, अभ्यासक आणि विविध विभागातील व्यावसायिक यांच्याकडून अभिप्राय घेणे महत्त्वाचे वाटते.

शालेय शिक्षणाचा टप्पा, अभ्यासक्रमाचे क्षेत्र, शालेय प्रशासन, मूल्यमापन हे घटक नमूद करून अभिप्राय मागविला जातो.

तुम्ही तुमचा अभिप्राय खालील ईमेल पत्त्यांवर पाठवू शकता- [email protected]

कागदपत्रांसाठीची लिंक: https://ncf.ncert.gov.in/webadmin/assets/b27f04eb-65af-467f-af12-105275251546

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.