इस्रायलच्या (Israel) हवाई हल्ल्यात हमासचा (Hamas) सर्वोच्च राजकीय नेता सलाह अल-बर्दावील (Salah al-Bardawil) आणि त्याची पत्नी ठार झाले आहेत. दि. २३ मार्च रोजी सकाळी हमासने या घटनेला दुजोरा दिला. दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात हा हल्ला करण्यात आला. गेल्या आठवड्यात दि. १२ मार्चला इस्रायलने (Israel) युद्धबंदीचा भंग करत गाझामध्ये पुन्हा हल्ला सुरु केला होता. यामध्ये सुमारे ६०० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गाझा शहरातील तीन भागांवर नवीन हल्ल्यांची योजना आखत असून तेथून पॅलेस्टिनींना (Palestine) निघून जाण्याचा इशारा दिला असल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले.
( हेही वाचा : IPL 2025, MI vs CSK : मुंबई इंडियन्सचा ४ गडी राखून पराभव करत चेन्नईची विजयी सुरुवात)
मिळालेल्या माहितीनुसार, हमासच्या (Hamas) ताब्यातील ५९ ओलिसांची सुटका होईपर्यंत इस्रायलने (Israel) गाझामध्ये (Gaza) हल्ले तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. या ओलिसांपैकी २४ जण जिवंत आहेत. यापूर्वी दि. १९ जानेवारी रोजी दोघांमध्ये युद्धबंदी झाली होती. यामध्ये, ओलिसांच्या सुटकेसाठी एक करार करण्यात आला. दि. २२ मार्च रोजी रात्री इस्रायलने (Israel) लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमधून डागलेल्या रॉकेटच्या प्रत्युत्तरात इस्रायलने हा हल्ला केला.
दरम्यान गेल्या ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या हिजबुल्लाहसोबतच्या (Hezbollah) युद्धबंदी नंतर इस्रायलचा हा पहिलाच मोठा हल्ला होता. हिजबुल्लाहने (Hezbollah) एक निवेदन जारी केले असून इस्रायलवर (Israel) रॉकेट डागले नाहीत आणि आम्ही युद्धबंदीचे पालन करत असल्याचे म्हटले आहे, तर लेबनीज सीमेजवळील मेतुला शहरातून सहा रॉकेट डागण्यात आले. यापैकी 3 इस्रायलमध्ये घुसले आणि हवेतच नष्ट झाल्याचे सांगत हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही; परंतु त्यांनी हिजबुल्लाह कमांड सेंटर आणि डझनभर रॉकेट लाँचर्सना लक्ष्य केले असल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लष्कराला लेबनॉनमध्ये प्रत्युत्तर देण्यास सांगितले आहे. (Salah al-Bardawil)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community