राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या कमबॅकमुळे जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यामध्ये नाराजी पसरली आहे. रश्मी शुक्ला यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून शुक्ला यांच्या भेटीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालक पदाबाबत आयपीएस लॉबीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणूक – २०२४ च्या निवडणुकीच्या संदर्भात विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक यांची निवडणूकपूर्वी बदली करण्यात आली होती, तसेच जेष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला होता. शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीचे सरकार राज्यात सत्ता स्थापन करणार आहे.
दरम्यान राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी रविवारी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून या भेटीनंतर राज्यातील पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे. रश्मी शुक्ला या पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर बसतील अशी चर्चा आयपीएस अधिकाऱ्यामध्ये सुरू आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना दोन वर्षांचा कालावधी वाढवून दिल्यामुळे दोन वर्षे राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून शुक्ला असतील. शुक्ला यांच्या येण्यामुळे जेष्ठ आयपीएस अधिकारी यांच्यात नाराजी असून रश्मी शुक्ला यांना यापूर्वीच दोन वर्षांचा कालावधी वाढविण्यात आला आहे, त्यात पुन्हा त्या पोलीस महासंचालक पदावर रुजू झाल्यावर जेष्ठ आयपीएस अधिकारी यांची या पदावर वर्णी लागणार नसल्यामुळे जेष्ठ आयपीएस अधिकारी यांच्यात नाराजी पसरली आहे.
रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहे, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर राजकीय पक्षपातीपणाचा आरोप करत तिच्याविरुद्ध औपचारिक तक्रार केली होती आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी तिची बदली करण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या आदेशाचे अंशतः पालन केल्याबद्दल आयोगाने शुक्ला आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्यावर ताशेरे ओढले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या (एसईसी) अधिकाऱ्यांनी मात्र, निवडणूक आयोगाच्या आदेशात बदलीचे कोणतेही कारण नमूद केलेले नव्हते.
Join Our WhatsApp Community