ज्येष्ठ पत्रकार आणि मार्मिक साप्ताहिकाचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे आज पहाटे राहत्या घरी झोपेतच निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेतील एक ध्येयवेडे आणि परखड व्यक्तिमत्त्व हरपले आहे. (Pandharinath Sawant)
सावंत यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात बेस्ट कंडक्टर ते मार्मिकचे कार्यकारी संपादक असा उल्लेखनीय प्रवास केला. त्यांच्या कार्याची दखल घेत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार, तसेच मराठी पत्रकार परिषद, मुंबई आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांचे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले होते. (Pandharinath Sawant)
(हेही वाचा- Worli Adarsh Nagar खंडणी प्रकरणात खडणीखोरामागे राजकीय वरदहस्त असल्याचा वकीलाचा दावा)
त्यांना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विशेष स्नेह लाभला होता. बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. (Pandharinath Sawant)
सावंत यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक धाडसी आणि अभ्यासू व्यक्ती गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. मुंबई मराठी पत्रकार परिषद मुंबई यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग दर्शवला आहे. (Pandharinath Sawant)
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी श्रद्धांजली सर्व स्तरांतून वाहिली जात आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community