साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित २३वे साहित्यिक कलावंत संमेलन २३ ते २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या साहित्यिक (literature) कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची निवड करण्यात आली आहे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित या संमेलनाचे उद्घाटन २३ रोजी दुपारी ४.३० वाजता महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी अध्यक्ष ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, आमदार भीमराव तापकीर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे मुख्य आयोजक दिलीप बराटे यांनी दिली.
अशी असेल कार्यक्रमांची रेलचेल
उदघाटनाची कार्यक्रमानंतरसंध्याकाळी सात वाजता पुरुषोत्तम व सकाळ करंडक विजेत्या एकांकिका सादर होणार आहेत. संमेलनात २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता प्रसिद्ध रानकवी ना. धों. महानोर यांच्या कविता आणि गीतांवर आधारित ‘जीवनगाणे’ हा संगीतमय कार्यक्रम होईल. यानंतर दुपारी दोन वाजता ‘आरक्षण आणि महाराष्ट्राचे भवितव्य?’ या विषयावर डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे दपारी चार वाजता ‘अभिनेत्याशी गप्पा’ या कार्यकमात प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी राजेश दामले संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता स्व. रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ यंदाच्या ‘वाग्यज्ञे’ साहित्य व कला गौरव पुरस्कारांचे वितरण अंमळनेर येथे होणाऱ्या ९७व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख व प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी सात वाजता प्रा. प्रभाकर साळेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘हा जल्लोष महाराष्ट्राचा’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. यानंतर दुपारी दोन वाजता प्रा. आप्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन कार्यक्रम होणार आहे. दुपारी चार वाजता ‘गझलगुंजन’ ही प्रसिद्ध गझलकारांची गझल मैफल होणार आहे.
(हेही वाचा Devendra Fadanvis : श्री शनेश्वर देवस्थानाच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा)
Join Our WhatsApp Community