लोकलमध्ये ज्येष्ठांसाठी हवा स्वतंत्र डबा; उच्च न्यायालयात जनहित याचिका

79

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकलमध्ये दिव्यांगाप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करावा, अशी मागणी करत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. एक ज्येष्ठ नागरिक असलेल्या वकिलाकडून ही जनहित याचिका केली गेली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. के.पी.नायर हे पूर्वी न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सचिव म्हणून कार्यरत होते, त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुंबईतील लोकलमधून प्रवास करताना ऐन गर्दीच्यावेळी ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते याकडे नायर यांनी याचिकेतून लक्ष वेधलेले आहे.

( हेही वाचा: New Whatsapp Feature: आता तुमच्या Notes आणि Documents सांभाळून ठेवता येणार )

ज्येष्ठ नागरिकांसाठी उपनगरीय लोकलमध्ये स्वतंत्र डबा उलब्ध करण्याच्या मागणीसंदर्भात 9 ऑगस्ट 2019 रोजी आपण तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनाही निवेदन दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सार्वजनिक तक्रार कक्षाने त्याची एक प्रत रेल्वे प्रशासनाकडेही पाठवली होती. त्यावर 2 जानेवारी 2020 रोजी रेल्वेने प्रतिसाद देत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करणे शक्य नसल्याचे कळवलेले आहे. त्यामुळे आपण याप्रकरणी ही याचिका दाखल केल्याचेही नायर यांनी याचिकेत नमूद केलेले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.