E-Vehicles : महावितरणकडून ई-व्हेहीकलसाठी वेगळी वीज जोडणी

वायू प्रदूषण रोखणे, ई-वाहनांना प्रोत्साहन देणे यासाठी ही उपाययोजना राबवण्याचा सरकारचा निर्णय

149
E-Vehicles : महावितरणकडून ई-व्हेहीकलसाठी वेगळी वीज जोडणी
E-Vehicles : महावितरणकडून ई-व्हेहीकलसाठी वेगळी वीज जोडणी

ई-वाहने घेतलेल्या चालकांसाठी आता सरकारने स्वतंत्र मीटर व नवे दरपत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी, ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही उपाययोजना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे घरगुती वापराच्या वीज मीटरचे युनिट कमी होणार असल्याने पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल, अशी आशा सरकारने व्यक्त केली.

सध्या वीज वापराच्या विविध स्लेबच्या दराप्रमाणे वीज आकारणी आकारली जात असल्याने वीज बिल जास्त होते. चार्जिंग करताना घरगुती वीज जोडणीमुळे विजेचे बील जास्त येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढत होत्या. यावर उपाययोजना अंमलात आणण्यासाठीची तयारी महावितरणने दर्शवली. ई-वाहनांसाठी स्वतंत्र जोडणी, मीटर आणि दरपत्रक सुरु करण्याचा महावितरणने निर्णय घेतला.

(हेही वाचा – Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ९.०५ वाजता होणार)

नवी जोडणी सुरु करण्याची प्रक्रिया – 
  • ग्राहकांनी तारतंत्रीचा विद्युत अहवाल जोडणे बंधनकारक आहे. यामध्ये वीज मागणीच्या क्षमतेनुसार अनामत रक्कम भरून घेतली जाते. या प्रक्रियेनंतर वीज मीटर दिले जाईल.
दर आकारणी प्रक्रिया – 
  • घरगुती ग्राहकांना १ ते १०० युनिट वापरासाठी ४ रुपये ४१ पैसे दर आकारला जातो. आता घरगुती वीज दर आकारणी पद्धत बंद होत आता एकच दर आकारला जाईल.
  • चार चाकी वाहन चार्ज करण्यासाठी ७-८ तास लागतात. या काळात ३० युनिट वीज चार्जिंगसाठी वापरली जाते. पूर्ण चार्जिंगचे चारचाकी वाहन ४०० किलोमीटर अंतर पूर्ण करते.
  • दुचाकी चार्जिंगसाठी ४ युनिट वीज वापरली जाते. त्यासाठी स्लो चार्जरचे पाच तास तर रेपिड चार्जरचे दोन तास लागतात. ४ युनिटमध्ये दुचाकी किमान १५० ते २०० किलोमीटर अंतर कापते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.