कोरोनापासून बचावासाठी अनेकांनी घेतलेल्या सिरम इन्सस्टीट्यूटच्या कोवीशील्ड या लशीविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत सिरम इन्सस्टिट्यूट कोरोना प्रतिबंधक लसीचे 20 कोटी डोसेस नष्ट करणार आहे. सिरम इन्सस्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे. गरजेपेक्षा जास्त डोसची निर्मीती झाल्याने, हे डोस नष्ट करावे लागणार असल्याचे, आदर पुनावाला यांनी म्हटले आहे.
( हेही वाचा: ‘आधी लगीन कोंढाण्याचे, नंतर रायबाचे’ त्या रायबाचे पुढे काय झाले ? )