गेल्या पाच वर्षांमध्ये सेप्टिक टॅंकची (Septic Tank Accident) साफसफाई करतांना तब्बल ३४७ सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अशातच गुरुवार ११ मे रोजी या आकड्यांमध्ये पुन्हा भर पडली आहे.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात गुरुवार ११ मे रोजी एक अपघात झाला. या अपघातात पाच सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. (Septic Tank Accident)
(हेही वाचा – बॉडी बिल्डर संकल्प भाटकरकडून आई वडिलांवर जीवघेणा हल्ला: आईचा मृत्यू, वडील चिंताजनक)
भाऊचा तांडा या परिसरातील एका शेतकऱ्याच्या घरातील सेप्टिक टॅंक (Septic Tank Accident) स्वच्छ करण्याचे कंत्राट या कामगारांनी घेतले होते. मृत झालेल्या पाच कामगारांमध्ये शेख सादेक (वय ५५), शेख जुनेद (वय ३२) शेख शारोक (वय २८), शेख नवीद (वय २८), आणि शेख फेरोज (वय २९) यांचा समावेश आहे.
हेही पहा –
चूक कोणाची?
या अपघातामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या पाच जणांना परभणी जिल्ह्यातील सामन्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. शेख साबेर यांची तब्येत गंभीर असल्याने त्यांना परळी येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे कामगार रात्रीच्या वेळी टॅंक साफ करायला उतरले होते. सहापैकी पाच जण टॅंकच्या (Septic Tank Accident) आत होते तर एक जण त्यावर उभा होता. स्वच्छतेचे काम करताना त्या टॅंकमध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाल की स्वच्छता करणाऱ्या मशीनचा शॉक लागून मृत्यू झाला हे अद्याप समोर आलेले नाही.
Join Our WhatsApp Community