सध्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोव्हीशील्ड या कोरोनाप्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन थांबलेले आहे. कारण आहे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या लसीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या निर्यातीवर आणलेली बंदी. त्यामुळे एका बाजूला लसीसाठी भारतातील नागरिक तळमळत आहेत आणि दुसरीकडे विश्वासघात करावा त्याप्रमाणे ऐन वेळी अमेरिकेने भारतातील लसीचे उत्पादन थांबेल, असे कारस्थान रचले आहे. त्यामुळे हताश झालेले सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांनी अक्षरशः हात जोडून कच्चा माल पाठवा, अशी विनंती ट्विटरद्वारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना केली आहे.
भारताला एकाकी पाडण्याचे कारस्थान!
सीरम इन्स्टिट्युट अमेरिकेतील ऑस्ट्राझेनिका आणि ऑक्सफोर्ड यांच्यासोबत कोव्हीशील्ड या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन करत आहे. सध्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमध्ये महिन्याला ६ ते ६.५ कोटी डोसचे उत्पादन होत आहे, हे १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून जून २०२१ पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. परंतु अमेरिकेने यात खोडा घातला आहे. लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्यातच रोखून धरली आहे. विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्ष पदासाठी भारतीय मतांची आवश्यकता होती म्हणून ज्या जो बायडन यांनी उप राष्ट्राध्यक्ष पदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उमेदवारी दिली, त्यांच्याकडे बघून लाखो अमेरिकन भारतीयांनी बायडन यांना मते दिली, तेच बायडन आता उघडपणे भारताला एकाकी पाडण्याचे कारस्थान रचत आहेत, असा आरोप आता होऊ लागला आहे.
(हेही वाचा : मुसलमानांनो, कोरोना लसीचे २ डोस घ्या, तरच कराल हज यात्रा! कुणी घेतला निर्णय? वाचा…)
पुनावाला यांची विनंती!
देशात एकीकडे लसीकरण सुरु असताना अनेक राज्ये लसींचा तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार करत आहेत. लसीकरणावरुन अनेक राज्ये आणि केंद्र सरकार आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. अशा वेळी सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी लासनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा अमेरिकन थांबवल्याचे सांगितल्यावर हल्लकल्लोळ माजला. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली आहे.
काय म्हटले पूनावालांनी?
Respected @POTUS, if we are to truly unite in beating this virus, on behalf of the vaccine industry outside the U.S., I humbly request you to lift the embargo of raw material exports out of the U.S. so that vaccine production can ramp up. Your administration has the details. 🙏🙏
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 16, 2021
आदरणीय जो बायडेन…जर आपण खरंच करोना व्हायरसविरोधातील लढाईत एकत्र आहोत तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगाच्या वतीने मी आपणांस नम्रपणे विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा. यामुळे लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. तुमच्या प्रशासनाकडे याची सविस्तर माहिती आहे, असे अदर पुनावाला यांनी म्हटले असून त्यांनी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ट्विटमध्ये टॅग करत विनंती केली आहे.
Join Our WhatsApp Community