सीरम इन्सिट्यूटने तयार केली गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस

106

भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होतो. या घातक आजारावर मात करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस ही स्वदेशी लस विकसित केली असून, सीरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नाॅलाॅजी उद्याच 1 सप्टेंबर रोजी ही लस लाॅंच करणार आहेत.

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ने अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला गर्भाशयाच्या कर्करोगावरील प्रभावी लस तयार करण्यास परवानगी दिली आहे.

( हेही वाचा: भारतीय सैनिकांना फसवण्यासाठी पाकिस्तानने रचला ‘हा’ नवा डाव; वाचा सविस्तर )

1 सप्टेंबरला लाॅंच करणार लस

स्वदेशी विकसित देशातील पहिली क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमावायरस वॅक्सीन गुरुवारी म्हणजेच 1 सप्टेंबरला लाॅंच केली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बायोटेक्नाॅलाॅजी विभागाने 1 सप्टेंबर रोजी गर्भाशयाच्या कर्करोगावरील उपचारासाठी स्वेदशी लस विकसित करण्याची योजना आखली. सीरम इन्स्टिट्यूटच्या qHPV लसीला DCGI कडून 12 जुलै रोजी मार्केट ऑशरायझेशन मिळाले होते. या आजारावरील प्रभावी लस भारत सध्या परदेशातून आयात करतो. त्यामुळे त्यासाठी जास्त खर्च येतो. आता ही लस देशातच उपलब्ध झाल्यामुळे लसीवरील खर्च कमी होऊन रुग्णांना अगदी सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.