पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे पासून देशभरात १८ वर्षांहून पुढच्या वयाच्या सर्वांचे सरसकट लसीकरण करण्यात यावे, अशी घोषणा केली. त्यानंतर दोनच दिवसांत पुण्यातील कोविशिल्ड लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने लसीची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कालपर्यंत खासगी रुग्णालयांसाठी २५० रुपयांना मिळणारी लस आता मात्र ६०० रुपयांना मिळणार आहे.
IMPORTANT ANNOUNCEMENT pic.twitter.com/bTsMs8AKth
— SerumInstituteIndia (@SerumInstIndia) April 21, 2021
५० टक्के लस राज्य सरकारे आणि खासगी रुग्णालयांना!
सीरमने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली. केंद्र सरकारच्या अर्थ आणि आरोग्य मंत्रालय यांनी देशात लसीकरणाच्या मोहिमेची व्याप्ती वाढवली आहे. तसेच लसींचे उत्पादन केल्यावर ते थेट राज्यांना, खासगी रुग्णालये आणि कोविड सेंटर्सना देण्याची मुभा दिली आहे, याचे आम्ही स्वागत करतो. येत्या २ महिन्यांत आम्ही लस उत्पादनाची क्षमता वाढवणार आहे. एकूण लस उत्पादनापैकी ५० टक्के लस केंद्र सरकारला देण्यात येईल आणि ५० टक्के लस राज्य सरकारे आणि खासगी रुग्णालये यांना देण्यात येणार आहे.
(हेही वाचा : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबवा, पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र)
अशी किंमत असणार कोविशिल्डची!
- राज्य सरकारांना ही लस ४०० रुपयांना उपलब्ध केली जाणार आहे.
- खासगी रुग्णालयांना ही लस ६०० रुपयांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अन्य देशांच्या लसी तुलनेने महाग!
यावेळी सीरमने प्रसिद्धीपत्रकात म्हटले कि, जरी आम्ही आमच्या लसीची किंमत वाढवली, तरी ती जगभरातील अन्य लसींच्या किमतीपेक्षा स्वस्त असल्याचा दावा करत त्या लसींची किंमतही दिली अमेरिकेच्या लसीची किंमत १,५०० रुपये आहे, रशियाच्या लसीचे किंमत ७५० रुपये आहे, तर चीनच्या लसीची किंमत ७५० रुपये आहे, असेही सीरमने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community