सीरम आता मंकीपॉक्सलाही रोखणार, पुनावालांची माहिती

कोरोनानंतर आता मंकीपॉक्सने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटना(WHO)ने मंकीपॉक्सला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे आता जगात मंकीपॉक्सचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्सला रोखण्यासाठी आता लसीकरणाचा पर्याय समोर येऊ लागला आहे.

सीरमच्या पुनावालांची माहिती

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाचा मोठा फायदा झाला होता. कोरोना काळात भारतासह अन्य देशांनाही लस पुरवठा करणा-या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने आता मंकीपॉक्ससाठी लस विकसित करण्याचा विचार सुरू केला आहे. सीरमची जागतिक भागीदार असलेली कंपनी नोवावॅक्ससोबत मंकीपॉक्सची एमआरएनए ही लस विकसित करण्याचा विचार सुरू असल्याचे सीरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः पुण्यातून गेल्या ७ महिन्यात ८४० महिला बेपत्ता!)

स्मॉलपॉक्सवर देखील लस

कोरोना काळात देशात सर्वाधिक वितरित करण्यात आलेली कोविशील्ड लस भारतात विकसित करण्यात सीरमचा मोठा वाटा आहे. सीरमने भारतासह इतरही देशांना ही लस पुरवली होती. दरम्यान कांजिण्यांसाठी देण्यात येणारी लस ही मंकीपॉक्सवर प्रभावी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. पण स्मॉलपॉक्स या आजारावर अजून कोणतीही लस विकसित करण्यात आलेली नाही. त्यामुळे एका जर्मन कंपनीसोबत या आजारावरील लस विकसित करण्याचा विचारही सीरमकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here