नाशिकमध्ये एकाच दिवशी सात घरफोड्या

140

नाशिक येथील कळवण शहरात एकाच दिवशी पहाटे 2 ते 4 या कालावधीत सात ठिकाणी घरफोडी होऊन लाखोंचा दस्तऐवज लुटण्यात चोरांना यश आले आहे. एका घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संबंधित एका चोराला टिपण्यात आले असून, काही घरांत चोराचे ठसे मिळाले आहेत. कळवण पोलिसांकडून घरफोडी बाबत गुन्हा दाखल झाला असून, तपासाची चक्र फिरू लागली आहेत.

एकाच दिवशी सात घरफोड्या

सात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी चोरांनी हाथ साफ केले असून सोने, चांदी, महागडे कपडे, साड्या, रोकड व अन्य असा लाखोंचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला आहे. गांधी चौकातील सुनिल देवघरे, वड गल्लीतील सुरेश जंगम, युवराज मालपुरे, सुभाष पेठेतील बाबुलाल महाजन, लोकमान्य टिळक चौकातील प्रभाकर कोठावदे, नवीन ओतूर रोड, पाण्याची टाकी परिसरातून जाकीर शेख, निकम मॅडम या सात जणांच्या गेल्या ८ ते १५ दिवसांपासून बंद असलेल्या घरातून चोरांनी एकाच दिवशी हात साफ केला.

पंचनाम्याला सुरुवात

सुभाष पेठेतील बाबुलाल महाजन यांच्या घराबाहेरील दोन ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले असता, एका चोराची हालचाल कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आढळून आले आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार हिंमत चव्हाण, हवालदार भोये, अनिल निकम, नाईक शरद शिंदे यांच्या पथकाने पंचनामा करत तपास सुरू केला आहे. बाहेरगावी जाणाऱ्यांची बंद असलेली घरे ही नेहमी चोरांच्या नजरेत असतात.त्यामुळे त्यांनी पाळत ठेवून अंदाज घेत एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत.

सीसीटीव्हीत आढळलेल्या एका संशयिताचा संदर्भ लागल्यास कळवण पोलिसांशी संपर्क साधावा. नागरिकांनी काळजी घ्यावी व कोणाबद्दल संशय आल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.