आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) शनिवारी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. हे प्रकरण राज्याच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये घडले. छोटा हत्ती (Chhota Hatti) वाहनात ठेवलेल्या कार्डबोर्ड बॉक्समध्ये सात कोटी (Seven crores) रुपये लपवले होते. प्रवासा दरम्यान रोकड घेऊन जाणाऱ्या वाहनाला एका लॉरीने धडक दिली. त्यावेळी वाहन उलटले आणि संपूर्ण प्रकरण समोर आले. (Andhra Pradesh)
(हेही वाचा – जेव्हा पक्ष कमजोर होतो तेव्हा Sharad Pawar काँग्रेसमध्ये जातात; फडणवीसांचा हल्लाबोल)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व गोदावरी जिल्ह्यातील नल्लाजरला मंडलातील अनंतपल्ली येथे एका चारचाकी छोट्या हत्तीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या नोटा नेल्या जात होत्या. ०७ पुठ्ठ्याच्या खोक्यात हे पैसे भरून ठेवले होते. प्रवासा दरम्यान एका लॉरीने धडक दिली असता चारचाकी छोटा हत्ती वाहन पलटी झाल्यामुळे खोक्यातील रक्कम बाहेर विखुरली गेली आणि हे प्रकरण उघडकीस आले. यावेळी जप्त करण्यात आलेली रोकड सात कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा – राऊत, ठाकरे अज्ञातवासात जातील; Chandrashekhar Bawankule यांची टीका)
अपघातात छोटा हात्तीचा चालकही जखमी झाला असून त्याला गोपालपुरम येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी शुक्रवारी देखील आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यात तपासणीदरम्यान पोलिसांनी पाईपने भरलेल्या ट्रकमधून सुमारे ८ कोटी रुपये जप्त केले होते. संबंधित ट्रक आणि पैसे जप्त करण्यात आले असून, त्या ट्रकमधून प्रवास करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
१३ मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यात (Lok Sabha Eelction 2024) आंध्र प्रदेशातील सर्व २५ जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये अराकू, श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, अनकापल्ले, काकीनाडा, अमलापुरम, राजमुंद्री, नरसापुरम, एलुरु, मछलीपट्टणम, विजयवाडा, गुंटूर, नरसरावपेट, बापटला, ओंगोले, नंद्याल, कुरनूल, अनंतपुर, हिंदूपुरम, कुरनुल, कूड्डापुरम, हिंदुस्थानचा समावेश असून, राजमपेट आणि चित्तूरच्या जागांचा ही समावेश आहे. (Andhra Pradesh)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community