अहमदाबादमध्ये लिफ्ट कोसळून सात जणांचा मृत्यू

गुजरातमधील अहमदाबाद येथे बुधवारी मोठी दुर्घटना घडली आहे. गुजरात विद्यापीठाजवळील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून सात मजूरांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच एका जखमी मजूरावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुजरात विद्यापीठाजवळ असलेल्या पासपोर्ट ऑफिसजवळ ही इमारत असल्याचे सांगण्यात येत आहे.

लिफ्ट कोसळून अपघात

एम्पायर-२ असं या इमारतीचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी सकाळी इमरातीचं बांधकाम चालू असताना अचानक लिफ्ट खाली कोसळली. त्यामध्ये काम करणारे अनेक मजूर लिफ्टखाली अडकले. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाला या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्यांची पथके घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी मजूरांना बाहेर काढण्याचे काम झाले. पण यामध्ये सात मजुरांना आपला प्राण गमवावा लागल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितले आहे.

कारण अस्पष्ट

यामध्ये सात मृतांसोबतच एक मजूर गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर सोला सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातामागचे कारण अजून अस्पष्ट असून त्याबाबत तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांकडून आता चौकशी करण्यास सुरूवात झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here